Friday, July 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दशक्रिया विधीची खबर मिळाली अन् शेजाऱ्यानेच केला घात! सराईत चोराला माहिती पुरवली अन् २.६५ लाखांचे दागिने लंपास

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 30 July 2026, 20:30

अक्षय टेमगिरे

शिक्रापूर : शेजारधर्माच्या नात्यालाच काळिमा फासणारी धक्कादायक घटना शिरूर तालुक्यात उघडकीस आली आहे. दशक्रिया विधीसाठी संपूर्ण कुटुंब घराबाहेर जाणार असल्याची माहिती घराशेजारी राहणाऱ्या व्यक्तीनेच सराईत चोराला पुरवली. त्यानंतर बंद घरावर डल्ला मारून तब्बल २ लाख ६५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले. या घटनेनंतर शिक्रापूर पोलिसांनी तांत्रिक तपास सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे अवघ्या काही दिवसांत गुन्ह्याचा छडा लावत चोरीचा संपूर्ण मुद्देमाल जप्त केला आहे.

ढेरंगेवस्ती ता. शिरूर येथील किरण पंडित ढेरंगे हे आपल्या कुटुंबासह दशक्रिया विधीसाठी बाहेरगावी गेले होते. घर बंद असल्याची अचूक माहिती मिळाल्यानंतर आरोपींनी नियोजनबद्ध पद्धतीने घराचे कुलूप तोडले. त्यानंतर घरातील कपाटातून गंठण चैन कानातील वेल डोरले यांसह सुमारे २ लाख ६५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले.

 

घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हाती घेतली. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक विश्लेषण तसेच गुप्त माहितीच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान धनंजय उर्फ धनाजी दत्तात्रय घोडके रा. कात्रज पुणे याचा सहभाग निष्पन्न झाला आहे. त्याला अटक केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून चोरीस गेलेले सर्व सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत.

या प्रकरणातील तपासात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली असून घराशेजारी राहणारा दिपक बाळासाहेब ढेरंगे रा. ढेरंगेवस्ती कोरेगाव भीमा यानेच घरातील हालचालींची माहिती आरोपीला पुरवून चोरी घडवून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे निष्पन्न झाले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू असून न्यायालयाने मुख्य आरोपीस चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर, महेश डोंगरे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे, तसेच गुन्हे शोध पथकातील लहानू बांगर, श्रावण गुपचे, नवनाथ नाईकडे, रोहीदास पारखे, श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, शिवाजी चितारे, अमोल नलगे, नारायण वाळके, राम जाधव, मच्छिंद्र निचीत यांनी सहभाग घेत ही उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

जून कोरडा गेला अन् जुलैने अक्षरशः झोडपले! पुण्यात पडला तब्बल ५०८ मिमी पाऊस; मोडीत निघाले सर्व जुने विक्रम

Thursday, 30 July 2026, 23:01

‘आमचं लग्न ठरलं होतं; महाबळेश्वरला हॉटेलसुद्धा बुक” ZP सदस्याच्या अत्याचार प्रकरणात मोठा खुलासा; तरुणी म्हणाली” शरीरसंबंध ठेवत त्याने…

Thursday, 30 July 2026, 22:24

शिक्रापूरमधील शिवराज मोबाईल रिपेअरिंग दुकान फोडून १७ हजार ६०० रुपयांचा ऐवज लंपास

Thursday, 30 July 2026, 21:42

उरुळी कांचन-शिंदवणे रस्त्यावर दुचाकीचा भीषण अपघात; ओव्हरटेक करताना दोन तरुण 100 फूट घसरले, थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद; पहा Video

Thursday, 30 July 2026, 21:33

पुणे महापालिकेसमोर शिंदेंच्या शिवसेनेचा राडा! गेटवर कचरा टाकून मुख्य प्रवेशद्वारासमोर ठिय्या; प्रशासनावविरोधात तीव्र संताप

Thursday, 30 July 2026, 21:25

ज्यांच्यावर सुरक्षेची जबाबदारी, तेच बनले चोर! टेम्पो अडवला अन् बिंग फुटलं; पुण्यातील उद्यानात झाडांची अवैध कत्तल

Thursday, 30 July 2026, 20:43
Next Post

स्व. प्रा. शुभांगी गावडे यांच्या जयंतीनिमित्त लोणी काळभोरमध्ये पर्यावरण व आरोग्याचा संदेश

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.