Friday, August 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ज्यांच्यावर सुरक्षेची जबाबदारी, तेच बनले चोर! टेम्पो अडवला अन् बिंग फुटलं; पुण्यातील उद्यानात झाडांची अवैध कत्तल

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 30 July 2026, 20:43

पुणे: पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे उद्यानात झाडांची बेकायदेशीर तोड करून लाकडांची चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात महापालिकेच्या उद्यान विभागातील कर्मचाऱ्यासह पाच जणांविरुद्ध पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

ही घटना 28 जुलै रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास उघडकीस आली. तन्मय बाबर हे त्यांच्या सहकाऱ्यासह खडकवासला येथून महर्षीनगरकडे जात असताना त्यांना पु. ल. देशपांडे उद्यानात एक टेम्पो उभा असल्याचे दिसले. त्यामध्ये झाडांची तोड केलेले लाकूड भरले जात असल्याचा संशय आल्याने त्यांनी काही अंतरावर टेम्पो अडवून चालकाकडे चौकशी केली.

सुरुवातीला चालकाने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी ही लाकडे एका सोसायटीतून आणल्याचे सांगितले. मात्र, अधिक विचारणा केल्यानंतर त्यांची उत्तरे विसंगत वाटू लागल्याने बाबर यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी टेम्पोतील व्यक्तींची चौकशी केली असता, लाकूड पु. ल. देशपांडे उद्यानातून आणल्याची बाब समोर आली.

तपासादरम्यान आरोपी तुकाराम कुंडगीर याने महापालिकेतील उद्यान मिस्त्री विकास नानासाहेब आटोळे यांच्या सांगण्यावरून झाडे तोडून लाकूड कोंढव्यातील वखारीत नेले जात असल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी विकास आटोळे यांची चौकशी केली. सुरुवातीला त्यांनी आरोप फेटाळले, मात्र पुढील चौकशी आणि उपलब्ध पुराव्यांनंतर त्यांनी झाडे तोडण्यास सांगितल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

तन्मय बाबर यांच्या तक्रारीवरून तुकाराम कुंडगीर, विकास आटोळे आणि त्यांच्या इतर तीन सहकाऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील चोरी आणि मालमत्तेचे नुकसान केल्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात असून, या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

‘आई तुझा मित्र मला तिथं हात लावतो’ मुलीनं घाबरत सांगितलं पण आईनं झिडकारलं; वडिलांना कळताच पायाखालची जमीन….

Friday, 28 August 2026, 12:42

पतीच्या मोबाईलमध्ये अश्लील चॅट्स पाहिले अन् जाब विचारला; पुण्यात विवाहितेला सासरच्यांकडून मारहाण

Friday, 28 August 2026, 12:35

मुंढेंनी फडणवीस-शिंदे अन् नांगरे-पाटलांनाही मागं टाकलं! राजकारणी पडले मागे, सनदी अधिकाऱ्याची हवा; तरुणांमध्ये मुंढेंची क्रेझ

Friday, 28 August 2026, 11:48

सोन्याचे भाव लवकरचं कोसळणार! सरकार घेणार मोठा निर्णय; खरेदीदारांसाठी महत्वाची बातमी

Friday, 28 August 2026, 11:39

पुण्यात राजकीय विरोधकांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी घरातील महिलेची केली हत्या; दोघांना जन्मठेपेची शिक्षा

Friday, 28 August 2026, 11:20

‘दादा आज तू नाही पण…’ अजितदादांच्या निधनानंतरचं पाहिलं रक्षाबंधन; दादांच्या आठवणीत सुप्रिया सुळे यांची डोळे पाणावणारी पोस्ट

Friday, 28 August 2026, 11:00
Next Post

पुणे महापालिकेसमोर शिंदेंच्या शिवसेनेचा राडा! गेटवर कचरा टाकून मुख्य प्रवेशद्वारासमोर ठिय्या; प्रशासनावविरोधात तीव्र संताप

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp