Friday, August 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

स्व. प्रा. शुभांगी गावडे यांच्या जयंतीनिमित्त लोणी काळभोरमध्ये पर्यावरण व आरोग्याचा संदेश

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 30 July 2026, 20:33

लोणी काळभोर, ता. ३० : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या माजी सचिवा स्व. प्रा. सौ. शुभांगीताई गावडे यांच्या जयंतीनिमित्त लोणी काळभोर (ता. हवेली) येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूलमध्ये गुरुवारी (ता. ३०) वृक्षारोपण, आरोग्य संवर्धन आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपासह विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. पर्यावरण संरक्षण, आरोग्य जागृती आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या कार्यक्रमाची सुरुवात स्व. शुभांगी गावडे यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी त्यांच्या शिक्षण, समाजसेवा आणि संस्थेच्या उभारणीत दिलेल्या उल्लेखनीय योगदानाचा गौरवपूर्ण शब्दांत आढावा घेण्यात आला. या कार्यक्रमास साधना सहकारी बँकेच्या अध्यक्षा वंदनाताई राजकुमार काळभोर, शासकीय आरोग्य अधिकारी मनोज थावरे, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सहसचिव (प्रशासन) तथा विद्यालयाचे प्राचार्य सीताराम गवळी, उपमुख्याध्यापक विलास शिंदे आणि वृक्षमित्र अमित जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यक्रमात विद्यालय परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांसाठी ‘आरोग्य संवर्धन ही काळाची गरज’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. आरोग्यदायी जीवनशैली, स्वच्छता आणि पर्यावरणाचे महत्त्व याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. वृक्षमित्र अमित जगताप यांनी वृक्षलागवडीचे महत्त्व पटवून देत प्रत्येक विद्यार्थ्याने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन केले. त्यांनी गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली. तर वंदनाताई काळभोर यांनीही विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करून त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन दिले.

दरम्यान, पर्यावरण संरक्षण, आरोग्य जागृती आणि समाजसेवेचा संदेश देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला. मान्यवर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षिका कल्पना बोरकर यांनी केले.चितारे, अमोल नलगे, नारायण वाळके, राम जाधव, मच्छिंद्र निचीत यांनी सहभाग घेत ही उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘आई तुझा मित्र मला तिथं हात लावतो’ मुलीनं घाबरत सांगितलं पण आईनं झिडकारलं; वडिलांना कळताच पायाखालची जमीन….

Friday, 28 August 2026, 12:42

पतीच्या मोबाईलमध्ये अश्लील चॅट्स पाहिले अन् जाब विचारला; पुण्यात विवाहितेला सासरच्यांकडून मारहाण

Friday, 28 August 2026, 12:35

मुंढेंनी फडणवीस-शिंदे अन् नांगरे-पाटलांनाही मागं टाकलं! राजकारणी पडले मागे, सनदी अधिकाऱ्याची हवा; तरुणांमध्ये मुंढेंची क्रेझ

Friday, 28 August 2026, 11:48

सोन्याचे भाव लवकरचं कोसळणार! सरकार घेणार मोठा निर्णय; खरेदीदारांसाठी महत्वाची बातमी

Friday, 28 August 2026, 11:39

पुण्यात राजकीय विरोधकांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी घरातील महिलेची केली हत्या; दोघांना जन्मठेपेची शिक्षा

Friday, 28 August 2026, 11:20

‘दादा आज तू नाही पण…’ अजितदादांच्या निधनानंतरचं पाहिलं रक्षाबंधन; दादांच्या आठवणीत सुप्रिया सुळे यांची डोळे पाणावणारी पोस्ट

Friday, 28 August 2026, 11:00
Next Post

शिंदे गटाच्या आमदाराला सुप्रीम कोर्टाचा दणका ! आमदारकीवर टांगती तलवार; कोर्टात मोठी घडामोड

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp