Sunday, September 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

जून कोरडा गेला अन् जुलैने अक्षरशः झोडपले! पुण्यात पडला तब्बल ५०८ मिमी पाऊस; मोडीत निघाले सर्व जुने विक्रम

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 30 July 2026, 23:01

पुणे: पुणे शहराने यंदाच्या जुलै महिन्यात पावसाचा तब्बल 119 वर्षांचा विक्रम मोडत नवा इतिहास रचला आहे. शिवाजीनगर वेधशाळेत जुलै महिन्यात 508.9 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, 1907 मध्ये झालेल्या 508.5 मिलिमीटर पावसाचा विक्रम मागे पडला आहे. त्यामुळे 2026 मधील जुलै हा पुण्याच्या हवामान इतिहासातील सर्वाधिक पावसाचा महिना ठरला आहे.

सामान्यतः पुण्यात जुलै महिन्यात सुमारे 187.2 मिलिमीटर पाऊस पडतो. मात्र यंदा या सरासरीपेक्षा अडीचपटाहून अधिक पावसाची नोंद झाली. जून महिना तुलनेने कोरडा गेला असला तरी जुलैच्या पहिल्या आणि तिसऱ्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे शहर आणि उपनगरांमध्ये पावसाचा जोर वाढला. यामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला, तसेच धरणांमधील पाणीसाठाही समाधानकारकरित्या वाढला.

गेल्या काही वर्षांतील आकडेवारीवर नजर टाकल्यास 2020 मध्ये जुलै महिन्यात सर्वात कमी, म्हणजे 119.8 मिलिमीटर पाऊस झाला होता. त्यानंतर 2021 मध्ये 193 मिलिमीटर, 2022 मध्ये 386.2 मिलिमीटर, 2023 मध्ये 154.5 मिलिमीटर, 2024 मध्ये 394 मिलिमीटर आणि 2025 मध्ये 130.3 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. याआधीचा 404 मिलिमीटरचा विक्रमही यंदा मागे पडला आहे.

1 जून ते 29 जुलै 2026 या कालावधीत पुण्यात एकूण 572.9 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, त्यापैकी केवळ 64 मिलिमीटर पाऊस जूनमध्ये झाला होता. जुलैतील मुसळधार पावसामुळे जूनची तूट मोठ्या प्रमाणात भरून निघाली.

 

हवामान तज्ज्ञांच्या मते, यंदा राज्यात पावसाचे वितरण असमान राहिले आहे. काही जिल्ह्यांतील घाट परिसरात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला, तर काही भागांत अजूनही पावसाची कमतरता आहे. सध्या सक्रिय हवामान प्रणालींच्या प्रभावामुळे पुढील दोन दिवस पुणे जिल्ह्यात, विशेषतः घाटमाथ्यावर, मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता असून त्यानंतर पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी गजानन महाराज संस्थान धावलं! मुख्यमंत्र्यांकडे लाखमोलाची मदत सुपूर्द

Sunday, 27 September 2026, 17:09

पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारला 30 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी, नेमका आरोप काय?

Sunday, 27 September 2026, 16:51

पुण्यात 33 तासांच्या मिरवणुका, मग दगडूशेठ गणपतीची मिरवणूक अवघ्या 4 तासांत कशी संपली? चर्चेला उधाण!

Sunday, 27 September 2026, 16:32

“20 लाखांची मागणी, 50 हजार घेताना रंगेहाथ! पुणे महापालिकेचा वैद्यकीय अधिकारी एसीबीच्या जाळ्यात”

Sunday, 27 September 2026, 16:13

अभिजीत दीपकेंच्या ‘गुरु’चं गूढ उलगडलं! सगळ्या प्लॅनिंगमागे कोण? महाराष्ट्र कनेक्शन चर्चेत

Sunday, 27 September 2026, 15:30

मुंबईत दुर्घटना ! सार्वजनिक शौचालयातील केमिकल गळती ठरली जीवघेणी; 2 तरुणांचा मृत्यू

Sunday, 27 September 2026, 15:10
Next Post

Daily Horoscope: शुक्रवारचा महायोग! या राशींच्या आयुष्यात आज होणार मोठा बदल; तुमची रास आहे का? पहा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp