लोणी काळभोर : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने लोणी काळभोर (ता. हवेली) येथील कन्या शाळेत ‘नारी शक्ती फिटनेस रन’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विद्यालयातील ३३ विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला, अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका निशा झिंजुरके यांनी दिली.
‘नारी शक्ती फिटनेस रन’चे आयोजन पुणे नेहरू युवा केंद्र व सुभद्रा माऊली प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. यावेळी 500 मीटर धावण्याच्या स्पर्धेत एकूण 33 मुलींनी सहभाग घेतला. धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक गायत्री दादासो वीरकर, द्वितीय क्रमांक स्वरूपा सतीश खुरंगे व तृतीय क्रमांक सानिध्या विजय काळभोर यांनी मारला.
विजेत्या स्पर्धकांना टी शर्ट, कॅप व प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले. यावेळी शारीरिक शिक्षक ठाकरे, कदम, सूर्यवंशी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, महिलांमध्ये क्रीडा संस्कृती, खिलाडूवृत्ती, तंदुरुस्ती आणि स्पर्धात्मक भावना वाढवणे आहे. त्यामुळे महिला तंदुरुस्त होतील. ज्यामुळे त्यांचे आरोग्य, आत्मविश्वास आणि एकूणच कल्याण होईल. याशिवाय, हे महिलांच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण देखील वाढवेल. हा कार्यक्रम भारतातील महिलांच्या सामर्थ्याचा आणि क्षमतेचा पुरावा ठरेल आणि त्याचा प्रसार होईल. हा याच्या पाठीमागचा शासनाचा हेतू आहे.