संदीप टूले
केडगाव : दौंड तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या भीमा साखर कामगार संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत श्री नागेश्वर कामगार परिवर्तन पॅनलने २२ पैकी २१ जागांवर दणदणीत विजय मिळवत कामगार प्रगती पॅनेलच्या उमेदवारांचा पराभव केला. मागील दहा वर्षांपासून भीमा कामगार संघावर एकहाती वर्चस्व असलेल्या कामगार प्रगती पॅनेलच्या सत्तेला सुरुंग लावण्यात श्री नागेश्वर कामगार परिवर्तन पॅनलला यश आले आहे.
भीमा साखर कामगार संघाची पंचवार्षिक निवडणूक मंगळवारी (ता. ३०) पार पडली. या निवडणुकीत श्री नागेश्वर कामगार परिवर्तन पॅनेल विरुद्ध कामगार प्रगती पॅनेलने उमेदवार उभे केले होते. यामध्ये २२ जागांसाठी एकूण ४७ उमेदवार रिंगणात उभे होते. तर एकूण ४६४ मतदारांपैकी ४६१ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता.
नवनिर्वाचित विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे
प्रवीण रामचंद्र शितोळे (अध्यक्ष), केशव वसंत दिवेकर (उपाध्यक्ष), रघुनाथ रंगनाथ शेळके (जनरल सेक्रेटरी), गोरख जगन्नाथ फुलारी (सेक्रेटरी), दीपक नानासो पाटणकर (खजिनदार), गिरीश प्रतापराव कदम, भाऊ लालासो शितोळे (पदाधिकारी, ऑफिस बेअरर्स), चंद्रकांत तुकाराम हंडाळ, दादा भागुजी ठवरे, नानासाहेब मारुती भागवत, प्रदीप आनंदराव शितोळे, प्रकाश साहेबराव गुंड, बाळासाहेब बबन माकर, मच्छिंद्र निवृत्ती शितोळे, महादेव भाऊसो टेंगले, मारुती बाबासाहेब गोरे, रवींद्र शशिकांत चव्हाण, राजेंद्र मारुती शितोळे, वसंत पोपट थोरात, सुभाष जिजाबा मोरे, सुरेश बबन वाघोले, हेमंत व्यंकटेश पाटणकर.
कामगार प्रगती पॅनलचे एकमेव उमेदवार रघुनाथ रंगनाथ शेळके हे जनरल सेक्रेटरी या पदासाठी विजयी झाले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अशोक शितोळे व सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून विठ्ठल काकडे यांनी कामकाज पाहिले.