पुणे : शहरासह देशात होळी आणि धुळवड मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. मुक्तपणे रंगाची उधळण केली जात आहे. राजकारणातील रंग आपण नेहमीच पाहत असतो. होळीनिमित्ताने कोणी कोणाला रंग लावला तरी त्याची चर्चा चांगलीच रंगवली जाते. अशीच एक चर्चाा पुण्याच्या राजकारणात रंगली आहे.
पुण्याचे खासदार गिरीश बापट आणि राज्य सभेचे माजी खासदार आणि भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे यांनी एकमेकांना रंग लावला आहे. बापट आजारपणामुळे राजकराणात सक्रीय नाहीत. त्यामुळे आजी माजी खासदारांची धुळवड भविष्यातील राजकारणात नव्याने रंग भरतील का ? अशी चर्चा सुरू झाली आहे.
होळी आणि धुळवडीच्या पार्श्वभूमीवर खासदार गिरीश बापट यांच्यासोबत रंग खेळून त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी माजी खासदार संजय काकडे यांनी प्रार्थना केली. तर, खासदार गिरीश बापट यांनी काकडे यांना पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद दिले. पुण्यातील राजकारणाची ही नवीन नांदी ठरणार का हे येणाऱ्या काळात दिसणार आहे.