पुणे : पार्टी चोरली, चिन्ह चोरलं, राजकीय यंत्रणादेखील चोरली आणि आता मागील अनेक वर्षांपासून शरद पवार यांची ज्या मैदानावर आजपर्यंत प्रचाराची सांगता सभा होत आली. ते मैदान देखील त्यांनी (अजित पवार)चोरलं, अशी टीका शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार याचं नाव न घेता केली. आमदार रोहित पवार एका प्रसारमाध्यमाशी सवांद साधला. यावेळी ते बोलत होते.
आजपर्यंत बारामतीमध्ये जय ठिकाणी शरद पवार हे प्रचाराची सांगता सभा घेत आले. त्याच ठिकाण अजित पवार यांनी सभा आयोजित केली आहे. त्यामुळे शरद पवार यांना सभेचं ठिकाण बदलावं लागलं आहे, त्यामुळे रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर पुन्हा जोरदार टीका केली आहे. झाले आहेत.
पुढे बोलताना म्हणाले, मी आज एवढच म्हणेन की, सगळं चोरलं तरी विचार, कार्यकर्ते, सर्व सामान्य नागरिक चोरता आले नाहीत. त्यामुळे या गद्दारांना बारामती लोकसभा मतदारसंघातील नागरिक लोकशाहीच्या माध्यमांमधून धडा शिकवतील. तसेच सुप्रिया सुळे या किमान साडे लाख मतांनी विजयी होतील, तसेच राज्यातील अनेक भागात मविआ चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आम्हाला 35 जागा मिळतील असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला.
पवार कुटुंबात कधी फूट पडेल आणि पवार विरुद्ध पवार अशी लढत पाहायला मिळेल, असे कधी वाटले होते का? या प्रश्नावर रोहित पवार म्हणाले की, मला अनेक महिन्यांपासून वाटत होते की, पवार कुटुंबात फूट पाडण्याचा भाजप प्रयत्न करीत होते. पण मला नेहमी वाटायच की, पवार कुटुंब स्वाभिमानी असल्याने, कुटुंबातून कोणीही फुटणार नाही.
याबाबत मला विश्वास होता. मात्र दुर्दैवाने अजितदादा भाजपसोबत गेले आहेत. त्यांना त्यांचं साम्राज्य टिकवायचं होतं. तसेच केंद्रीय तपास यंत्रणांकडून त्यांच्यावर कारवाई होणार होती. त्यामुळे व्यक्तिगत दृष्टीकोनातून अजित पवार भाजपसोबत गेले आहेत. आम्ही मराठी माणसं, स्वाभिमानी माणसं आहोत. त्यामुळेच आज आम्ही संघर्षाची भूमिका घेतली असून आमच्यासोबत महाराष्ट्र असल्याची भूमिका यावेळी त्यांनी मांडली.