संदिप टूले
केडगाव : दौंड तालुक्यातील एकेरीवाडी येथे आमदार राहुल कुल यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या सुमारे १२ कोटी ७७ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा शनिवारी (दि.२४) ग्रामस्थांच्या उपस्थित पार पडला. यावेळी बोलताना आमदार राहुल कुल म्हणाले की, एकेरीवाडीवर माझे विशेष लक्ष असून, आगामी काळात या गावाला निधी कमी पडू देणार नाही.
तसेच आपली ताकद केंद्रपर्यंत आता वाढली असून, आगामी काळात दौंड तालुक्यातील प्रत्येक गाव सुजलाम सुफलाम कसे होईल याचे प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. पहिले खराब रस्ता चालू झाला की दौंड तालुका चालू झाला, असे समजायचे. पण आता ती दौंडची ओळख पूर्णपणे बदलली आहे. आता चांगले रस्ते चालू झाले की दौंड चालू झाले असे समजायचे अशी दौंडची नवीन ओळख निर्माण करण्यात आपल्याला यश आले आहे.
तसेच पाण्याच्या बाबतीत येणाऱ्या काळात १०० वर्षाचे पाण्याचे नियोजन आपण करत आहोत. मुळशीचे पाणी आपण दौंड तालुक्यातील कसे आणता येईल, याचे नियोजन चालू आहे. येणाऱ्या उन्हाळ्यात दौंड तालुक्याला पाण्याची दोन आवर्तने मिळाली असून, यामुळे पाण्याचा बराचसा प्रश्न मिटणार आहे.
एकेरीवाडी गावाला १२ कोटी ७७ लाख रुपयांचा निधी
एकेरीवाडी ग्रामपंचायत स्थापनेपासून इतक्या मोठा प्रमाणात निधी प्रथमच मिळाला असून, आमदार राहुल कुल यांनी एकेरीवाडीच्या विकासात मोठा हातभार लावला असल्याचे नागरिकांनी सांगितले.
आमदार राहुल कुल यांना आपला जुना सहकारी गेल्याची खंत
एकेरीवाडीचे मा. सरपंच कै.विजय टूले यांचे मागील वर्षी निधन झाले होते. यांची आमदार राहुल कुल यांनी उद्घाटनप्रसंगी आवर्जून आठवण काढत व विजय टूले हे खूप निष्ठावंत कार्यकर्ते होते. खूप प्रामाणिकपणे त्यांनी काम केले. शेवटपर्यंत एकनिष्ठ राहिले. त्यांच्या जाण्याने दुःख व्यक्त करत पण आमदार राहुल कुल हे आपल्या कार्यकर्त्यावर किती प्रेम असते. याची प्रचिती या कार्यक्रमप्रसंगी सर्वांना पाहायला मिळाली.
या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी आमदार राहुल कुल, भाजप तालुकाध्यक्ष हरिश्चंद्र ठोंबरे भीमा पाटस कारखान्याचे संचालक विकास शेलार, भाजपा संघटक सरचिटणीस उमेश देवकर, दौंड बाजार समितीचे सभापती गणेश जगदाळे, बांधकाम विभागाचे अभियंता खबीले, प्रभारी सरपंच निर्मला टूले, मोहन टूले, तुकाराम टूले, अंकुश टूले, सुदाम टकले, बापूराव टूले, अर्जुन टूले, संजय टूले, पांडुरंग टकले, प्रवीण टूले, सोनबापू टूले, सचिन टूले, रोहिदास टूले, प्रशांत महारनवर, जयसिंग मदने आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.