दौंड : दौंड येथील पंचायत समिती कार्यालयात १५ ऑगस्ट रोजी तालुक्यातील ग्रामीण स्तरावर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजनेतील विविध कामे करण्यासाठी नियुक्त ग्रामरोजगार सेवकांना दौंडचे आमदार राहुल कुल यांच्याहस्ते टॅब संचाचे वाटप करण्यात आले.
यावेळी आमदार राहुल कुल, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, सहायक गटविकास अधिकारी शितल बुलबुले, दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश जगदाळे, सहायक कार्यक्रम अधिकारी विकास गाजबिव, रोहयोचे तांत्रिक साहय्यक सचिन वाघमोडे, अमोल माने, आश्विन वाघमारे, दौंड तालुका ग्रामरोजगार सेवक संघटनेचे अध्यक्ष विजयकुमार शेळके, उपाध्यक्ष सागर चोधरी, आदी सह दौंड तालुक्यातील ग्रामरोजगार सेवक उपस्थित होते. सदरील टॅबचे वाटप हे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजना नियोजन विभाग मंत्रालय मुंबई यांच्या वतीने तालुक्यातील ७१ ग्रामरोजगार सेवकांना सुपूर्द करण्यात आले.
या टॅबमुळे ग्रामरोजगार सेवकांना आपापल्या ग्राम स्तरावर चालू असलेल्या मातोश्री पांदन शेत रस्ते, सिंचन विहरी, विविध फळबाग, वृक्ष लागवड, प्रधानमंत्री आवास घरकूल, रमाई घरकूल, फूलशेती लागवड, पशूधन शेत गोठे या बरोबरच नरेगा योजनेअंतर्गतच्या कामांसाठी मदत होणार आहे. यामध्ये नियुक्त केलेल्या मजूरांची डिमांड देणे, मजुराचे जाबकार्ड काढणे, बॅंकेचे बचतखाते लिंक करणे, जिओ टैगिंग करणे, मजूराचे कामावरील मस्टर काढणे, इत्यादी कामे टॅबवर करता येणार आहेत.
यापूर्वी ही कामे ग्रामरोजगार सेवकांना पंचायत समितीतील रोजगार हमी कक्षात दररोज ये-जा करावी लागत होती. आता तो हेलपाटा मारणे टळले जाणार असून, रोजगार हमीच्या कामाना गती मिळणार आहे. कारण रोजगार हमी योजनेची सर्वच कामे टॅबवर आनलाइन होणार आहेत. सदर टॅब वाटप करण्यात आल्यामुळे संपूर्ण ग्रामरोजगार सेवकाकडून शासनासह दौंडचे आमदार राहुल कुल व गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांनी वरिष्ठ स्तरावर प्रयत्न करुन टॅब उपलब्ध करुन दिल्यामुळे त्यांचे आभार मानले जात आहेत.
योजना तळागाळातील लाभर्थ्यापर्यंत पोहचवा..: गटविकास अधिकारी
रोहयो अंतर्गत येणाऱ्या योजनेमध्ये दौंड तालुका एक नंबरला आहे. प्रत्येक ग्रामरोजगार सेवकांनी आपल्या योजना अंतिम घटकापर्यंत पोहचविण्याचे काम करावे. कारण ग्रामरोजगार सेवक रोहयो विभागाचा पाठीचा कणा आहे.
ग्रामरोजगार सेवकांनी शेतकऱ्यांना केंद्र बिंदू मानून काम करावे : आ. राहुल कुल
रोहयो अंतर्गत येणाऱ्या योजना ह्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना केंद्र बिंदू मानून काम करायचे आहे. चांगले काम करणाऱ्यांना माझा सदैव्य पाठिंबा राहील पण चुकीचं करणाऱ्यांना सोडलं जाणार नाही.