Monday, July 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उरुळी कांचनमध्ये अल्पवयीन मुलीला दुसऱ्यांदा फुस लावून पळवले; अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Monday, 22 June 2026, 16:14

उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतून साडेसतरा वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली अज्ञात व्यक्तीने आमिष दाखवून तिला पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी उरुळी कांचन पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 137 (2) अंतर्गत अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना रविवारी (ता. 21) भरदिवसा सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. यापूर्वीही या मुलीला अशाच पद्धतीने पळवून नेण्यात आले होते, त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळेच वळण मिळाले आहे. याप्रकरणी 75 वर्षीय आजोबांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे आपली मुलगी, जावई आणि नातवासोबत उरुळी कांचन येथे राहतात. त्यांचा मुलगा हा रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो आणि तो पुणे येथे राहतो. 14 जूनला फिर्यादी यांच्या मुलाने आपली मुलगी हिला उरुळी कांचन येथे आजोबांकडे आणून सोडले होते. तेव्हापासूनती आजोबांकडेच राहत होती.

 

रविवारी (ता. 21) सकाळी साडेआठ वाजता घरातील इतर सदस्य नेहमीप्रमाणे शेतीकामासाठी शेतावर निघून गेले होते आणि घरात केवळ वर्षीय आजोबा आणि नात हे दोघेच होते. सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास मुलगी आजोबांना काहीही न सांगता घरातून अचानक गायब झाली. आजोबांनी आणि नातेवाईकांनी उरुळी कांचन परिसर, व सर्व नातेवाईक आणि पुण्यात तिच्या आई-वडिलांकडे शोध घेतला. मात्र, तिचा कुठेही ठावठिकाणा लागला नाही.

दरम्यान, यापूर्वीही अल्पवयीन मुलीला अशाच प्रकारे फुस लावून पळवून नेण्यात आले होते, तेव्हा बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर ती मिळून आली होती. त्यामुळे आता पुन्हा तिला कोणीतरी फुस लावून पळवल्याची आजोबांची खात्री झाली. याप्रकरणी आजोबांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक कांबळे करीत आहेत.

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

तुकाराम मुंढेंच्या FDA ला हायकोर्टाचा दणका; धडक मोहिमेला कोर्टाचा ब्रेक?

Monday, 27 July 2026, 13:19

क्रिकेट स्पर्धेतील गोळीबार प्रकरणात योगेश मचालेसह टोळीवर मोक्का; शिरूर पोलिसांची कारवाई

Monday, 27 July 2026, 12:38

श्री वेंकटेश मंदिर विकासकामांना सुरुवात; आणखी 2 कोटींचा निधी मंजूर

Monday, 27 July 2026, 12:12

राजगडमध्ये दहशत माजवणाऱ्या अक्षय इंगुळकरसह टोळीला दणका; पोलिसांकडून मोक्काची कारवाई

Monday, 27 July 2026, 12:07

NEET नंतर आता महाराष्ट्रातही पेपरफुटी! 100 पैकी 90 प्रश्न आधीच व्हायरल; विद्यार्थ्यांमध्ये संताप

Monday, 27 July 2026, 10:37

महावितरणच्या वीजेच्या बॉक्सचा करंट लागून 63 वर्षीय महिलेचा मृत्यू; पुण्यातील घटना

Monday, 27 July 2026, 10:11
Next Post

पुणेकरांनो, उद्यापासून भिडे पूल बंद! प्रवासाचे नियोजन बदलले, वाचा हे पर्यायी मार्ग

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.