Tuesday, July 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

राजगडमध्ये दहशत माजवणाऱ्या अक्षय इंगुळकरसह टोळीला दणका; पोलिसांकडून मोक्काची कारवाई

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 27 July 2026, 12:07

राजगड: राजगड परिसरात उच्छाद मांडत दहशत माजवणाऱ्या कुख्यात गुंड अक्षय लक्ष्मण इंगुळकर आणि त्याच्या संघटित गुन्हेगारी टोळीवर अखेर कठोर कारवाई करण्यात आली आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी या कुख्यात टोळीविरोधात ‘मोक्का’ (MCOCA) कायद्यांतर्गत कारवाई करण्यास अधिकृत मंजुरी दिली आहे. परिसरामध्ये कायद्याचा वचक निर्माण व्हावा आणि सर्वसामान्यांमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी, यासाठी हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

कापूरहोळ ते नारायणपूर रोडवर 3 मार्च 2026 रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ही थरारक घटना घडली होती. फिर्यादी महेश उर्फ लखन दळवी यांचा १७ वर्षीय मुलगा पृथ्वीराज हा आपली अ‍ॅक्टिव्हा मोटारसायकलवरून घरी जात असताना, एका कारमधून आलेल्या ५ अनोळखी इसमांनी त्याची गाडी अडवली. आरोपींनी त्याला बळजबरीने कारमध्ये बसवले आणि “आमच्यावर केसेस करणार का? आज तुला जिवंत सोडत नाही” असे म्हणत बंदुकीचा धाक दाखवला. याप्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा कसून तपास करत पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मुख्य सूत्रधार अक्षय लक्ष्मण इंगुळकरसह त्याच्या टोळीचा सहभाग असल्याचा पर्दाफाश केला. या प्रकरणात पोलिसांनी एकूण ५ आरोपींना जेरबंद केले असून, ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. अक्षय लक्ष्मण इंगुळकर, अक्षय दत्तात्रय भालेराव, अथर्व सचिन इंगुळकर, गणेश महेंद्र धाडवे आणि पंकज मोहन वाल्हेकर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत, तर इतर २ आरोपी अजूनही फरार आहेत. दरम्यान, या टोळीवर यापूर्वीही खुनाचा प्रयत्न, दुखापत करणे आणि मारहाणीसारखे तब्बल ९ गंभीर गुन्हे दाखल असल्याने पोलिसांनी त्यांच्यावर मोक्कांतर्गत कारवाईचा प्रस्ताव पाठवला होता, ज्याला आता मंजुरी मिळाली आहे.

 

गुन्ह्याचा पुढील तपास सासवड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. ही यशस्वी कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल आणि बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, राजगड पोलीस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक राजेश गवळी, वर्तमान पोलीस निरीक्षक संतोष जाधव, पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक फौजदार महेश बनकर, रामदास बाबर, पोलीस हवालदार गणेश धनवे आणि संतोष भापकर यांनी कारवाई केली. याशिवाय राजगड पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार साहेबराव बाबर, पोलीस हवालदार सागर कोंढाळकर आणि पोलीस अंमलदार अक्षय नलावडे यांनी या तपासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

‘बापाच्या जीवावर उडतो का?’ पुण्यात विद्यार्थ्यासोबत घडलं भयंकर; किरकोळ कारणावरून पाठलाग करत मारहाण…

Tuesday, 28 July 2026, 14:31

शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट! दुसऱ्या यादीतील लाभार्थ्यांचा आकडा समोर;मात्र ‘या’ अटीशिवाय मिळणार नाही लाभ

Tuesday, 28 July 2026, 14:18

ऍसिडिटी आणि मानदुखीचा नेमका संबंध काय? जाणून घ्या महत्त्वाची माहिती

Tuesday, 28 July 2026, 14:12

कोटी रुपयांच्या कथित लूटप्रकरणात दोन पोलिसांवर निलंबनाची कारवाई; आरोपींचा शोध सुरू

Tuesday, 28 July 2026, 14:02

स्वच्छतेत इंदापूरची मोठी झेप! नगर परिषदेला हायटेक मशीन, कर्मचाऱ्यांना PPE किटचं वाटप

Tuesday, 28 July 2026, 13:40

जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणी कोर्टाचा मोठा आदेश! महाराष्ट्रासह 8 राज्यांना थेट नोटीस

Tuesday, 28 July 2026, 13:14
Next Post

श्री वेंकटेश मंदिर विकासकामांना सुरुवात; आणखी 2 कोटींचा निधी मंजूर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.