भिगवण : भिगवण परिसरात काल रात्री आणि आज दुपारी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांचे नुकसान झाले आहे. अचानक झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे आठवडे बाजारात आडतदार व्यापाऱ्यांनी घेतलेले धान्य तसेच मका व इतर शेतमाल पावसामुळे भिजला आहे. यामुळे भिगवण येथील धान्य आडतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार भिगवण मध्ये पावसाचे पाणी शिरल्यामुळे मार्केटमध्ये असणारे मक्याची पोती ही पावसाच्या पाण्यात भिजली आहेत. त्यामुळे अडत व्यापाऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे.