Thursday, September 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ताम्हिणी घाटात विवाहितेचा प्रियकरानेच केला घात! नवरा तुरुंगात असतांना तिनं बॉयफ्रेंड पटवला अन् त्यानं कारमध्येच तिच्यासोबत…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 28 August 2026, 8:25

पुणे: पुणे-माणगाव मार्गावरील ताम्हिणी घाटात ३० वर्षीय विवाहित महिलेची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोंडेथर गावाच्या हद्दीत मंगळवारी दुपारी झुडपांमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला होता. सुरुवातीला हा अपघाती मृत्यू असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आणि पोलिसांनी त्यानुसार नोंद केली. मात्र, वैद्यकीय तपासणीत महिलेचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी तपासाची दिशा बदलून आरोपींचा शोध सुरू केला.

सुमन गोपाळ यादव (वय ३०, रा. चिखली, पुणे) असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी दुर्गाप्रसाद प्रजापती (वय २४) आणि त्याचा चुलत भाऊ दिनेशकुमार प्रजापती (वय २७, दोघेही रा. पिंपरी-चिंचवड) यांना अटक केली आहे.

पोलिसांच्या तपासानुसार, सुमन आणि दुर्गाप्रसाद यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून संबंध होते. सुमनचा पती उत्तर प्रदेशातील एका गुन्ह्यात तुरुंगात असताना दोघांची जवळीक वाढली. पती तुरुंगातून बाहेर आल्यानंतर सुमन सुमारे दोन महिन्यांपूर्वी दुर्गाप्रसादसोबत चिखली येथे राहण्यास आली होती. मात्र, तिने आपल्या दोन लहान मुलांनाही सोबत आणून त्यांची जबाबदारी स्वीकारण्याचा आग्रह धरला. दुर्गाप्रसादला हा आग्रह मान्य नव्हता. यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाले.

अखेर दुर्गाप्रसादने सुमनचा काटा काढण्याचा निर्णय घेतल्याचे तपासात समोर आले. त्याने आपल्या चुलत भावाची मदत घेतली. दोघांनी फिरायला जाण्याच्या बहाण्याने सुमनला कारमध्ये बसवले. त्यानंतर कारमध्येच तिच्या ओढणीने गळा आवळून तिची हत्या केली. हत्या केल्यानंतर मृतदेह ताम्हिणी घाटातील झुडपांमध्ये टाकून आरोपी निघून गेले.

 

मृतदेह सापडल्यानंतर रायगड पोलिसांनी तपासाला वेग दिला. वैद्यकीय अहवालातून हत्या स्पष्ट झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने मोबाईल टॉवर डंप डेटा आणि तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने आरोपींचा माग काढला. पोलिसांनी अवघ्या २४ तासांत पिंपरी-चिंचवड येथून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. न्यायालयाने त्यांना ३१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, माणगाव पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

दिशा सालियन प्रकरण पुन्हा तापणार! घटनास्थळी आदित्य ठाकरेंना पाहिल्याचा दावा ; ‘त्या’ पेनड्राइव्हमध्ये नेमकं काय?

Wednesday, 23 September 2026, 22:57

बागेश्वर बाबांची ‘पुत्रयोग’ पर्ची ठरली चुकीची? चौथ्यांदाही मुलगी; अंनिसचं 1 कोटींचं खुलं आव्हान!

Wednesday, 23 September 2026, 22:32

पिपंरी चिंचवडमधील वायसीएम रुग्णालय परिसरात गणेश विसर्जन मिरवणुकीचा ‘थाट ‘पडला महागात! पोलिसांकडून थेट गुन्हा दाखल

Wednesday, 23 September 2026, 21:46

बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी! येत्या 27 सप्टेंबरच्या रविवारी बँका उघड्या राहणार, सरकारचा मोठा निर्णय

Wednesday, 23 September 2026, 20:40

रायगडमध्ये लाचखोरीचा पर्दाफाश!अध्यक्षांच्या स्वीय सहाय्यकाला 1.50 लाखांची लाच घेताना बेड्या

Wednesday, 23 September 2026, 20:17

वेस्ट इंडिज भारतात दाखल! 8 सामन्यांची थरारक मालिका; LIVE सामने कुठे आणि कधी पाहता येणार?

Wednesday, 23 September 2026, 19:59
Next Post

पहाटेच्या काळोखात अपघाताचा थरार! भरधाव कारचं नियंत्रण सुटलं, डिव्हाइडरला धडकून थेट ओढ्यात कोसळली; पुण्यातल्या २ तरुणांचा दुर्दैवी अंत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp