युनुस तांबोळी
Manchar News शिरूर : मंचर ( ता. आंबेगाव ) येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या वतीने “शेतकरी संवाद मेळावा” आयोजीत केला आहे. (Manchar News) अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती वसंत भालेराव यांनी दिली. (Manchar News)
मंचर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शरदराव पवार सभागृहात रविवार (ता. २५ ) जून २०२३ रोजी सकाळी ११.०० वा. शेतकरी सवांद मेळावा आयोजीत केला आहे. या कार्यक्रमासाठी माजी गृहमंत्री दिलीपरावजी वळसे पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या मेळाव्यात आंबेगाव व शिरूर परिसरातील शेतकरी बांधवानी उपस्थीती दाखवावी. शेती विषयक प्रश्न तसेच हवामानाचे अंदाज यासंदर्भात माहिती मिळणार आहे. बदलत्या हवामानाचा अंदाज यावर प्रसिध्द हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचे व्याख्यान होणार आहे.
दरम्यान, सध्या हवामानाच्या अंदाजात बदल होत असून मान्सूनचा पाऊस देखील लांबणीवर गेल्याने शेतकऱ्य़ांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा. तसेच कृषी विभागाचा सल्ला देखील महत्वाचा ठरणार आहे. यासाठी शेतकऱ्यांची उपस्थिती महत्वाची असल्याचे उपसभापती सचीन पानसरे यांनी सांगितले.