Monday, November 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वडकीत अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई! वाहनासह 5.50 लाखांचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 14 November 2026, 11:55

फुरसुंगी, ता. 14 : महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूची विक्री करण्याच्या उद्देशाने वाहनात साठवणूक केल्याचा प्रकार वडकी (ता. हवेली) येथे उघडकीस आला आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने शुक्रवारी (ता. 13) दहाव्या मैल परिसरातील श्रीनाथ बेकर्सच्या मागे छापा टाकून तब्बल तीन लाख एकसष्ट हजार दोनशे सत्तर रुपयांचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त केला. तसेच साठा वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे दोन लाख रुपये किमतीचे टाटा एस वाहनही जप्त करण्यात आले. या कारवाईत एकूण पाच लाख एकसष्ट हजार दोनशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

या प्रकरणी अनुपम विमलेशकुमार शुक्ला (वय 40, रा. दहावा मैल, वडकी, ता. हवेली) याच्याविरुद्ध फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्न व औषध प्रशासनाला वडकी परिसरात एका मालवाहू वाहनामध्ये प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार अन्न सुरक्षा अधिकारी सायली टाव्हरे, सहायक आयुक्त (अन्न) द. सु. साळुंखे, पंच साक्षीदार आणि फुरसुंगी पोलिसांच्या पथकाने दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास संबंधित ठिकाणी छापा टाकला.

यावेळी टाटा मोटर्सच्या एमएच 12 जेएफ 5867 क्रमांकाच्या वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित पानमसाला आणि सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आला. जप्त केलेल्या मालामध्ये केसरयुक्त विमल पानमसाला, व्ही-1 सुगंधित तंबाखू, रजनीगंधा पानमसाला, आरएमडी पानमसाला, एम सुगंधित तंबाखू, तुलसी रॉयल जाफरानी जर्दा, डायरेक्टर स्पेशल पानमसाला आणि प्रीमियम शॉट लक्झरी च्युइंग टोबॅको यांचा समावेश आहे. विविध ब्रँडच्या या प्रतिबंधित पदार्थांचा साठा विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.

साठ्याबाबत अनुपम शुक्ला याच्याकडे विचारणा केली असता त्याने हा माल स्वतःचा असल्याचे मान्य केले. मात्र, हा माल कोणाकडून खरेदी केला किंवा त्याचा पुरवठा कोणी केला, याबाबत समाधानकारक माहिती दिली नाही. तसेच मालाची खरेदी बिलेही आढळून आली नाहीत. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी विविध पदार्थांचे नमुने प्रयोगशाळेतील तपासणीसाठी ताब्यात घेतले असून उर्वरित साठा जप्त केला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या 13 जुलै 2026 रोजीच्या अधिसूचनेनुसार राज्यात 20 जुलै 2026 पासून एक वर्षाच्या कालावधीसाठी गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू आणि तत्सम प्रतिबंधित पदार्थांचे उत्पादन, साठवणूक, वितरण, वाहतूक व विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे. या बंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 तसेच भारतीय न्याय संहितेतील विविध कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे.

पुरवठादारांच्या साखळीचा तपास होणार?
जप्त करण्यात आलेल्या प्रतिबंधित पदार्थांच्या पाकिटांवर कर्नाटक, गुजरात, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील उत्पादक व पुरवठादारांची नावे आणि पत्ते नमूद असल्याने या मालाचा पुरवठा नेमका कोठून झाला, याचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे. केवळ साठा करणाऱ्यांपुरती कारवाई मर्यादित न ठेवता उत्पादक, पुरवठादार, वाहतूकदार आणि आर्थिक व्यवहारांशी संबंधित व्यक्तींपर्यंत तपास पोहोचविण्याची मागणी फिर्यादीत करण्यात आली आहे. तसेच तपासात संघटित गुन्हेगारीच्या कायदेशीर अटी पूर्ण होत असल्याचे निष्पन्न झाल्यास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) कारवाईचा प्रस्ताव विचारात घेण्याची मागणीही करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास फुरसुंगी पोलीस करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

बंगालच्या उपसागरात पुन्हा मोठं संकट! अर्णब आणि मुरासूनंतर आता ‘अक्वान’ चक्रीवादळाचा धोका; पुढचे ४८ तास अत्यंत महत्त्वाचे!

Sunday, 15 November 2026, 23:01

व्यवसायासाठी पैसे घेतले अन् परत केलेच नाहीत! मार्केट यार्डमधील व्यापारी पिता-पुत्राकडून महिलेची ५० लाखांची फसवणूक

Sunday, 15 November 2026, 21:39

महाबळेश्वरमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; ३ नामांकित हॉटेल्सचे परवाने निलंबित!

Sunday, 15 November 2026, 20:44

“कृषी व अन्य शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी व फार्मर आयडी तातडीने तयार करावा” मदत व पुनर्वसन विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

Sunday, 15 November 2026, 20:12

पुणेकरांसाठी एसटीची खास भेट! स्वारगेट आगारातून नऊ तीर्थाटन सहलींचे आयोजन; ज्येष्ठांना मोफत, महिलांना अर्धे तिकीट

Sunday, 15 November 2026, 20:08

पाथर्डीचा सुपुत्र हैदराबादचा पोलीसप्रमुख! आयपीएस महेश भागवत यांच्याकडे आयुक्तपदाची धुरा; विश्वास नांगरे-पाटलांकडून कौतुकाची थाप

Sunday, 15 November 2026, 18:55
Next Post

भावाच्या लग्नासाठी घेतलेल्या पैशांवरून वाद; मेहुण्याच्या सासऱ्याची दोघांना काठी-दगडाने मारहाण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp