Saturday, November 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भावाच्या लग्नासाठी घेतलेल्या पैशांवरून वाद; मेहुण्याच्या सासऱ्याची दोघांना काठी-दगडाने मारहाण

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 14 November 2026, 12:07

लोणी काळभोर, ता. 14 : भावाच्या लग्नासाठी घेतलेले पैसे परत देण्यावरून घरात सुरू असलेल्या चर्चेत हस्तक्षेप करत भावाच्या सासऱ्याने तरुणासह त्याच्या वडिलांना शिवीगाळ करून लाकडी काठी आणि दगडाने मारहाण केल्याची धक्कादायक घटना उरळी देवाची येथील विघ्नहर्ता पार्क परिसरात घडली. या मारहाणीत तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, त्याच्या डोक्याला तब्बल सहा टाके घालावे लागले आहेत. कौटुंबिक वादातून झालेल्या या मारहाण प्रकरणामुळे उरळी देवाची परिसरात खळबळ उडाली आहे.

कृष्णा शंकर चव्हाण (वय 28) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अमर कृष्णा भोसले (वय 40, रा. पंढरपूर, जि. सोलापूर) याच्याविरुद्ध फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा चव्हाण हे कुटुंबासह उरळी देवाची येथील विघ्नहर्ता पार्कमध्ये राहतात. 11 नोव्हेंबर रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास कृष्णा, त्यांचे वडील शंकर आणि भाऊ ऋषिकेश हे घरगुती विषयांवर चर्चा करत होते. यावेळी कृष्णा यांनी ऋषिकेश याला त्याच्या लग्नासाठी लोकांकडून घेतलेले पैसे परत करण्यास सांगितले. यावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला.

दरम्यान, ऋषिकेश याचे सासरे अमर भोसले तेथे आले. त्यांनी ‘तुम्ही माझ्या जावयाला का बोलता?’ असे म्हणत कृष्णा आणि त्यांच्या वडिलांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर कृष्णा यांना हाताने मारहाण केली. वडील शंकर हे मध्यस्थी करण्यासाठी आले असता भोसले यांनी त्यांच्या पायावर लाकडी काठीने वार केले. वडिलांना वाचविण्यासाठी कृष्णा मध्ये गेले असता त्यांच्या डोक्यात काठीने जोरदार प्रहार केला. त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर जखम होऊन रक्तस्राव सुरू झाला. एवढ्यावरच न थांबता आरोपीने शंकर यांच्या छातीवर दगड फेकून मारला.

त्यानंतर ‘माझ्या जावयाला पुन्हा बोललात तर तुम्हाला जिवंत ठेवणार नाही,’ अशी धमकी देत आरोपी तेथून निघून गेला. जखमी कृष्णा यांच्यावर उरळी देवाची येथील जीवन क्लिनिकमध्ये उपचार करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांच्या डोक्याच्या जखमेवर सहा टाके घातले. उपचारानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्यावर त्यांनी 12 नोव्हेंबर रोजी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार अमर भोसले यांच्यावर भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023 – 115(2),118(1),351(2),352 प्रमाणे फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

शिंदेंचं ‘ऑपरेशन टायगर’ पुन्हा धडकणार? पक्षांतराचा मुहूर्त ठरणार; उदय सामंतांनी दिले संकेत!

Saturday, 14 November 2026, 22:49

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! बावनकुळेंनी केली महत्त्वाची घोषणा; शेतकऱ्यांना दिलासा!

Saturday, 14 November 2026, 22:00

स्वच्छतेत पुण्याची घसरण! टॉप 10 मधूनही बाहेर; आठव्या स्थानावरून थेट 12 व्या क्रमांकावर, महापालिकेच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह!

Saturday, 14 November 2026, 20:56

माधुरी दीक्षित झाल्या ‘मॅडम’! पण अशोकमामांचा आजही ‘गं’वरच जोर; 42 वर्षांपूर्वीच्या आठवणींनी रंगली जुनी मैत्री!

Saturday, 14 November 2026, 20:32

पुणेकरांसाठी खुशखबर! उद्यापासून ‘भारत टॅक्सी’ सेवा सुरू; 50 हजारांहून अधिक कॅब चालकांची नोंदणी.

Saturday, 14 November 2026, 20:21

पुण्यात 28 लाखांचा ऐवज लुटून कुरिअर कर्मचारी फरार! पंचवीस दिवस 10 हजार किमी पाठलाग; अखेर चौघांना बेडया..

Saturday, 14 November 2026, 19:37
Next Post

शिरूर भूमी अभिलेख विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; गैरव्यवहारांच्या चौकशीसाठी नागरिक आक्रमक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp