Wednesday, September 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor: लोणी स्टेशन येथील हातभट्टीच्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा, रोहन शुक्लासह 9 जणांना अटक

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 2 March 2026, 14:22

लोणी काळभोर, ता. 2: लोणी स्टेशन (ता. हवेली) (Loni Kalbhor) येथील अवैध हातभट्टी विक्रीच्या ठिकाणी लोणी काळभोर पोलिसांनी शनिवारी (ता.28) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास छापा टाकला आहे. या छाप्यात पोलिसांनी 9 जणांना अटक केली आहे तर 1 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्व अवैध धंदे बंद असल्याचा दावा केला जात असताना हा अड्डा सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली होती. मात्र, पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे कोणत्याही बेकायदेशीर धंद्याला पाठबळ दिले जात नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

सागर मल्हारी कसबे (वय-30, रा. कवडीपाठ, टोलनाका, कवडीगांव ता. हवेली, जि. पुणे), दत्तात्रय नवनाथ मोहोळकर (वय-53, रा. गल्ली नं. 7, घोरपडेवस्ती, ता.हवेली, जि. पुणे), समाधान श्रावण कांबळे (वय-38, रा. इराणी गल्ली, कदमवाकवस्ती, ता. हवेली, जि. पुणे), राजु विष्णु बाविस्कर (वय-35, लोणी स्टेशन ता. हवेली. जि.पुणे), विजु किशन गोठे (वय-30, रा. आग्रेवस्ती, लोणीकाळभोर, ता. हवेली. जि.पुणे), निलेश दशरथ ससाणे (वय-35, , रा. आग्रेवस्ती, लोणी काळभोर, ता. हवेली), मातादीन जयराम जाटन (वय-45, रा. पालखी स्थळ, कदमवाकवस्ती, ता. हवेली, जि. पुणे), सर्जेराव विठ्ठल दुभाडे (वय-53, रा. इराणीवस्ती, प्यासा हॉटेलजवळ, कदमवाकवस्ती, ता. हवेली. जि.पुणे) व रोहन शुक्ला (रा.लोणीस्टेशन ता. हवेली जि.पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार महेंद्र भगवान आगळे यांनी सरकारच्या वतीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी स्टेशन येथील विश्वराज हॉस्पिटलशेजारी पत्र्याचे शेडमध्ये एक इसम हातभट्टी दारूची अवैध विक्री करत आहे. अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला तेव्हा त्या ठिकाणी बरेच इसम दारू पिण्यासाठी थांबलेले आढळून आले. तर 8 जण काळया रंगाच्या प्लास्टिक पिशव्यामधुन हातभट्टी दारू हातात घेवुन पित असताना सापडले.

दरम्यान, लोणी काळभोर पोलिसांनी या कारवाई 1 हजार 50 रुपयांची 15 लिटर हातभट्टी दारू जप्त केली आहे. तर 9 जणांवर महाराष्ट्र प्रोव्हिबिशन अॅक्ट कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक केली आहे. लोणी काळभोर परिसरात अवैध दारूविक्रीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी कडक भूमिका घेतली असून अशा बेकायदेशीर धंद्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

 

ही कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण जाधव, पोलीस हवालदार अशोक नळे, रामहरी वणवे, महेश करे, पोलीस अंमलदार महेंद्र आगळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे. लोणी काळभोर पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी मोठी बातमी! रखडलेला कात्रज-कोंढवा रस्ता मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे महापालिकेचे टार्गेट

Wednesday, 30 September 2026, 22:10

मुंबईसह राज्यभरात गरबा-दांडिया रद्द होणार? दुष्काळाच्या सावटाखाली गरबा-दांडियाचा मुद्दा तापला; मराठी एकीकरण समितीचा थेट विरोध

Wednesday, 30 September 2026, 21:05

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी सुनावणी! खरातच्या ‘त्या’ व्हिडिओंबाबत कोर्टाचा महत्वाचा आदेश; ‘व्हिडीओ वकिलांना दाखवा पण…’

Wednesday, 30 September 2026, 20:26

दुबईहून तेल अवीव जाणाऱ्या विमानात हायजॅकचा थरार! ९/११ सारख्या हल्ल्याचा कट? कॉकपिटमध्ये पायलटवर चाकूहल्ला; नेमकं काय घडलं?

Wednesday, 30 September 2026, 19:57

पृथ्वीराज कपूर हायस्कूल तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत प्रथम! जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी दिमाखात निवड

Wednesday, 30 September 2026, 19:34

सासरच्या त्रासाला कंटाळून पिंपळगाव येथे विवाहितेची आत्महत्या, पतीसह तिघांवर गुन्हा दाखल

Wednesday, 30 September 2026, 19:28
Next Post

Pune Crime : कॉलेजच्या कारभारावरून सख्ख्या भावाकडून मारहाण; लोणीकंदचे आदर्श सरपंच व माजी जिल्हा परिषद सदस्य शंकर भुमकर व त्यांचा मुलावर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp