Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोर येथे रेल्वेच्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू; अनोळखी इसमाची ओळख पटविण्याचे पोलिसांसमोर आव्हान

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 29 October 2025, 13:33

लोणी काळभोर, ता. 29: पुणे सोलापूर लोहमार्गावर (Loni Kalbhor News) रेल्वेच्या अपघातात एका अनोळखी इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील माळी मळा परिसरात असलेल्या शेल पेट्रोल पंपांच्या रेल्वे लाईनवर घडली असून बुधवारी (ता.29) सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. या अनोळखी इसमाची ओळख पटविण्याचे लोणी काळभोर पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे कर्मचारी रुळाची देखबाल व दुरुस्ती करीत असताना, त्यांना एका अनोळखी इसमाचा मृतदेह रेल्वे लाईनच्या जवळ आढळून आला. या घटनेची माहिती रेल्वे कर्मचाऱ्यांनी तत्काळ लोहमार्ग व लोणी काळभोर पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार विजय जाधव, केतन धेंडे, राणी खामकर व बीट मार्शल वैभव खोत व रेल्वेचे पोलीस हवालदार शेख मन्सूर अब्दुल करीम हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

 

दरम्यान, पोलिसांनी तत्काळ महाराजा रुग्णवाहिकेला बोलावले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्यासाठी रुग्णवाहिकेतून पुण्याला पाठविला आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे खरे कारण पुढे येईल. परंतु, हा इसम परप्रांतीय असून रेल्वेतून पडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.

नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधावा: राजेंद्र पन्हाळे

अपघातात मृत्यू झालेल्या अनोळखी इसमाचे अंदाजे वय – 35 ते 40, उंची 165 से.मी. चेहरा गोल, रंग- काळा सावळा, केस- काळे वाढलेले, शरीर बांधा मजबुत, अंगात पांढरा, काळा आणि लाल रंगाचा चेक्स शर्ट व हिरव्या रंगाची लुंगी नेसलेली आहे. त्याच्याजवळ रेडमी कंपनीचा डीसप्ले गेलेला मोबाईल सापडलेला आहे. अशा अनोळखी इसमाची ओळख पटविण्याचे काम लोणी काळभोर पोलिस करीत आहेत. या अनोळखी इसामाबाबत जर कोणाला काही माहिती मिळाल्यास त्यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या 020-29995260 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी केले आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Weather Update

Monsoon News : आनंदवार्ता! मोसमी वाऱ्यांची तळकोकणात दमदार एंट्री; पुणेकरांना पावसाची प्रतीक्षा संपणार?

Sunday, 7 June 2026, 12:07

Pune News : तुळापूरमध्ये मध्यरात्री ‘रेव्ह पार्टी’वर पोलिसांचा छापा ; 60 ते 70 तरुण-तरुणी ताब्यात, अमली पदार्थांचा संशय

Sunday, 7 June 2026, 10:40

वाळू माफिया आणि तहसीलदारांचे 6 लाखांत केले साटेलोटे; लाच स्वीकारताना तहसीलदार विजय चव्हाण एसीबीच्या जाळ्यात

Saturday, 6 June 2026, 20:47

अवैध मद्यविक्रीचे जाळे उध्वस्त करणार; पुणे-पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण पोलिसांची धडक मोहीम

Saturday, 6 June 2026, 20:11

पुणे-सातारा महामार्गावर ‘बर्निंग कार’चा थरार; काही मिनिटांतच गाडी जळून खाक, सर्व प्रवासी सुखरूप

Saturday, 6 June 2026, 19:42

प्रेयसीच्या प्रेमात पत्नीला विसरला पती; दोन मुलांच्या आईचा शारीरिक व मानसिक छळ, पतीविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 6 June 2026, 19:29
Next Post

संतापजनक! Online मागवलेल्या अंड्यांत अळ्या; ब्लिंकिटच्या सेवेवर मोठा प्रश्नचिन्ह

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.