Wednesday, July 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor: देव मंदिरात नाही, तर निर्मळ विचारांत – शशीराव शेंडगे

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 21 December 2025, 11:37

लोणी काळभोर, ता. 21 : संत गाडगे (Loni Kalbhor) महाराजांच्या कीर्तनातील “गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला” या शब्दांचा अर्थ असा आहे की, गोपाला म्हणजे केवळ ईश्वर नव्हे, तर दीन-दुबळ्यांचे अश्रू पुसणारा, समाजातील उपेक्षितांचा आधार बनणारा प्रत्येक माणूस होय. देव मंदिरात नाही, तर निर्मळ विचारांत आहे. हीच संतांची खरी शिकवण आपल्याला दिली असून ती आचरणात आणली पाहिजे. असे प्रतिपादन प्रमुख वक्ते शशीराव शेंडगे केले.

स्वच्छतेत देव पाहणारे, सेवेत धर्म मानणारे आणि कर्मकांडाला छेद देणारे थोर समाजसंत संत गाडगे महाराज यांच्या 69 व्या पुण्यस्मरणानिमित्त लोणी काळभोर (ता. हवेली) येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वरील प्रतिपादन शशीराव शेंडगे यांनी केले आहे. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य सिताराम गवळी,उपमुख्याध्यापक विलास शिंदे ,ज्येष्ठ शिक्षक सोमराज दळवी, शर्मिला साळुंखे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्राचार्य सिताराम गवळी यांनी संत गाडगे महाराजांचे जीवन म्हणजे चालते-बोलते विद्यापीठ असल्याचे नमूद केले. स्वच्छता, शिक्षण, सेवा आणि समतेचा संदेश देणाऱ्या या थोर संताचे विचार विद्यार्थ्यांच्या जीवनात प्रकाशपुंज ठरावेत, अशी अपेक्षा गवळी यांनी व्यक्त केली. तर दीनदुबळ्यांची सेवा करणे हीच ईश्वर सेवा हा संत गाडगे महाराजांचा मंत्र आचरणात कसा आणावा. या विषयावर जेष्ठ शिक्षक सोमराज दळवी यांनी विद्यार्थ्यांना बहुमुल्य मार्गदर्शन केले.

 

दरम्यान, संत गाडगे महाराजांच्या विचारांनी भारावलेल्या विद्यार्थ्यांच्या मनात सेवा, स्वच्छता व मानवतेची बीजे पेरली गेली. यावेळी सर्व विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी संत गाडगे महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन केले. तसेच त्यांच्या विचारांवर चालण्यासाठी यावेळी शपथ घेतली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक दयानंद जानराव यांनी केले.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

‘हॅलो मी सिया बोलतेय’ पोलीस पाटलाला गोडगोड बोलून फसवलं अन् शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली घातला ५६ लाखांचा गंडा…

Wednesday, 29 July 2026, 9:29

पुण्यात पावसाचा रौद्र अवतार पुन्हा पाहायला मिळणार? पुढील 3 दिवस जोरदार पावसाचा अंदाज; हवामान विभागाचा इशारा

Wednesday, 29 July 2026, 9:26

E20 पेट्रोलविरोधात दिल्लीत एल्गार! 4 ऑगस्टला संसदेवर धडकणार वाहनचालकांचा मोर्चा

Wednesday, 29 July 2026, 9:07

“नवरा आवडत नाही, दुसऱ्यावर प्रेम आहे?” संशयातून पत्नीला ठेचून संपवले; शिरूर येथील घटना

Wednesday, 29 July 2026, 8:47

कृष्णा आंदेकर टार्गेटवर! पोलिसांच्या ताफ्याचा चाकणपर्यंत केला पाठलाग; हल्ल्याचा थरारक कट अन्

Wednesday, 29 July 2026, 8:33

इराणने पुन्हा डागली क्षेपणास्त्रे; अमेरिकेला थेट आव्हान, परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता

Wednesday, 29 July 2026, 8:11
Next Post
Ajit Pawar

Pune News: पुण्यात गुन्हेगारी टोळ्यांची आता राजकारणात एन्ट्री? गजा मारणेची पत्नी 'दादां'च्या भेटीला; तिकीटासाठी बारामती हॉस्टेलवर खलबतं

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.