Loni Kalbhor News : लोणी काळभोर, (पुणे) : कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील जनता विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी संजय लक्ष्मण काळभोर यांची तर उपाध्यक्षपदी दत्तात्रय भिवा केसकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. (Loni Kalbhor News)
यापूर्वीचे अध्यक्ष सुर्यकांत दत्तात्रय काळभोर व उपाध्यक्ष दिनेश बाळासाहेब काळभोर यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिल्याने हि निवडणूक घेण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस. ए भोसले यांनी कामकाज पहिले.
यावेळी संजय काळभोर व दत्तात्रय केसकर यांनी अनुक्रमे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले. दरम्यान, दोन्ही जागांसाठी प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज आल्याने दोन्ही पदांची निवड बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी एस. ए भोसले यांनी केली. सचिव अविनाश कांबळे यांनी निवडणुकीचे कामकाज पहिले. (Loni Kalbhor News)
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य माधव काळभोर, दत्तात्रय काळभोर, शांताराम काळभोर, किसन कदम, महाराष्ट्र केसरी पै. राहुल काळभोर, संदेश काळभोर, जयराम केसकर, प्रताप कदम, मयूर कदम, संस्थेचे सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. आभार सुभाष कदम यांनी मानले.