Wednesday, June 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor Crime: कुंजीरवाडीत पैशांच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 13 April 2026, 17:31

लोणी काळभोर, ता. 13 : पैशांच्या वादातून तरुणावर (Loni Kalbhor Crime) लाथाबुक्क्यांनी मारहाण करत दगडाने डोक्यावर प्रहार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील मगरवस्ती परिसरात शुक्रवारी (ता.10) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून लोणी काळभोर पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरज गोपीनाथ घोळवे (वय 30), गोपीनाथ अजिनाथ घोळवे (वय 50), राजू बिटटू घोळवे (वय-35) व जनाबाई गोपीनाथ घोळवे (वय 46, सर्व रा. कुंजीरवाडी, ता. हवेली) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी आदेश अंकुश सोनवणे (वय 19, रा. शेवाळवाडी फाटा, मांजरी बुद्रुक) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आदेश सोनवणे यांच्या वडिलांकडे ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या सुरज घोळवे याने काही महिन्यांपूर्वीचे कामाचे पैसे मागण्यासाठी फोन करून शिवीगाळ केली होती. याबाबत जाब विचारण्यासाठी आदेश सोनवणे हा सुरजच्या घरी गेले होते. तेथे सुरजला पैसे मागण्याबाबत विचारणा करताच वाद वाढला. त्याचवेळी राजू बिटटू घोळवे याने मागून पकडले, तर सुरजने शिवीगाळ करत पैशांची मागणी केली. आदेश यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर सुरज व त्याचे नातेवाईक आक्रमक झाले.

दरम्यान, सुरजची आई जनाबाई घोळवे तसेच गोपीनाथ घोळवे व इतरही तेथे जमा झाले. सर्वांनी मिळून आदेश यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यावेळी सुरज घोळवे याने हातातील दगड उचलून आदेश यांच्या डोक्यावर प्रहार केला, ज्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. हल्ल्यानंतर आरोपींनी “पुन्हा आमच्या नादी लागलास तर जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी दिली .

जखमी अवस्थेत आदेश यांनी लोणी काळभोर पोलीस ठाणे गाठले, आणि आरोपींच्या विरोधात तक्रार दिली. त्यानुसार सुरज घोळवे, गोपीनाथ घोळवे, राजू घोळवे व जनाबाई घोळवे यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 च्या कलम 115(1), 118(1), 3(5), 351(2), 351(3), 352 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

कोरेगाव मूळ येथील स्विमिंग पूलमध्ये बुडून एका 12 वर्षीय मुलाचा मृत्यू

Wednesday, 10 June 2026, 16:21

“काँग्रेसला निवडणूक लढूच न देण्याचा कट झाला”; माजी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांचा गंभीर आरोप

Wednesday, 10 June 2026, 16:17

शिरूर तालुक्यात शेतातील वाद विकोपाला; निमगाव दुडे येथे मिरचीपूड फेकून शेतकरी कुटुंबावर दांडक्याने हल्ला

Wednesday, 10 June 2026, 16:10

उद्या पुण्यात ‘कॉकरोच जनता पार्टी’चं आंदोलन! पुणे विद्यापीठाकडून आंदोलनाला परवानगी; विद्यार्थ्यांसह हजारो लोकांचा सहभाग

Wednesday, 10 June 2026, 15:38

अनधिकृत बांधकाम पाडत नाही, फक्त अडीच लाख द्या; लाच घेताना सहाय्यक आयुक्त अडकले एसीबीच्या जाळ्यात

Wednesday, 10 June 2026, 15:27

पुणेकरांनो! डबल डेकर बस प्रकल्प लांबणीवर; ‘या’ अडथळ्यांमुळे घेतला निर्णय

Wednesday, 10 June 2026, 15:13
Next Post

आशा भोसलेंच्या निधनानंतर मंगेशकर कुटुंबाचा मोठा निर्णय; पुण्यात आज सायंकाळी हृदयनाथ मंगेशकर करणार मोठी घोषणा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.