Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“काँग्रेसला निवडणूक लढूच न देण्याचा कट झाला”; माजी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांचा गंभीर आरोप

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 10 June 2026, 16:17

पुणे, ता. १० : पुणे स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी उफाळून आली असून, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी पक्षाच्या राजकीय हिताला हानी पोहोचविणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि संघटन महासचिव के. सी. वेणुगोपाल यांना ई-मेलद्वारे सविस्तर निवेदन पाठविल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेत बोलताना अरविंद शिंदे यांनी, “पुणे स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाला निवडणूक लढता येऊ नये, यासाठी नियोजनबद्ध कट रचण्यात आला. पक्षाने निवडणूक लढूच नये, असे वातावरण मुद्दाम तयार करण्यात आले,” असा गंभीर आरोप केला.

शिंदे यांनी पक्षांतर्गत काही नेत्यांवर अप्रत्यक्ष निशाणा साधत, “वाटाघाटी करणारे आणि विरोधी पक्षांना छुपा पाठिंबा देणाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे. मागील काही निवडणुकांमध्ये भाजपला मदत झाल्याचे आरोप होत आहेत. त्यामुळे अशा व्यक्तींवर कठोर कारवाई व्हावी,” अशी मागणी केली.

 

यावेळी त्यांनी महापालिका निवडणूक आणि विधान परिषद निवडणूक या दोन्ही ठिकाणी शरद पवार गटाने काँग्रेसचा विश्वासघात केल्याचा आरोपही केला. “आघाडीतील सहकार्याच्या अपेक्षेने आम्ही वाटचाल केली; मात्र प्रत्यक्षात काँग्रेसच्या राजकीय हिताला धक्का बसला,” असे ते म्हणाले.

पुण्यातील राजकीय घडामोडींवर या आरोपांमुळे नव्याने चर्चा सुरू झाली असून, काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाकडून या तक्रारीची दखल घेतली जाणार का, याकडे पक्ष कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34

10 हजारांच्या लाचेने उघडलं कोट्यवधींचं बिंग! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलं 2.94 कोटींच घबाड

Saturday, 4 July 2026, 13:57

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42
Next Post

कोरेगाव मूळ येथील स्विमिंग पूलमध्ये बुडून एका 12 वर्षीय मुलाचा मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.