पुणे : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) तिस-या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. या टप्प्यातील बारामती मतदारसंघांतील (Baramati Constituency) निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यातील 48 मतदारसंघांमध्ये प्रचाराचा धुराळा उडणार आहे. यावेळी बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी बारामतीच्या माळेगावमधून (Malegaon) मतदान केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार मतदानासाठी केंद्रावर आल्यावर कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. त्यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर त्यांनी मतदानाचा हक्क बजाविला. शरद पवार यांच्यासह त्यांच्या अन्य कुटुंबियांनीही यावेळी मतदान केले.
काही वर्षांपूर्वी शरद पवारांनी बीसीसीआयच्या निवडणुकीसाठी आपले मतदान केंद्र बारामतीमधून मुंबईमध्ये (Mumbai) बदलून घेतले होते, मात्र यंदा निवडणूक अटीतटीची असल्याने पुन्हा बारामतीमध्ये मतदान करण्याचा निर्णय त्यांनी केला होता.