Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कर्ज घेतल्याची सातबाऱ्यावर नोंद, पण पैसे मिळालेच नाहीत! ‘कर्ज गेले कुठे?’ शेतकऱ्याने उपस्थित केला सवाल

योगेश मारणेby योगेश मारणे
Wednesday, 12 August 2026, 12:50

न्हावरे: पीक कर्जासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करूनही कर्जाचे वाटप करण्यात आले नसल्याची तक्रार आलेगाव पागा (ता.शिरूर) येथील शेतकरी अशोक सुदाम वाघचौरे यांनी केली आहे.विशेष म्हणजे,त्यांच्या सातबारा उताऱ्यावर पीककर्जाचा बोजाही नोंदविण्यात आला आहे. त्यामुळे ‘कर्जच गेले चोरीला?’ असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे.

अशोक वाघचौरे यांनी आलेगाव पागा येथील संभाजी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेविरोधात सहकार विभागाकडे तक्रार केली होती.या तक्रारीची दखल घेत जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था,पुणे(ग्रामीण)यांनी सहाय्यक निबंधक,सहकारी संस्था,शिरूर यांना पत्र देऊन या प्रकरणाची प्रशासकीय चौकशी करून आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.

पात्र सभासदांना नियमानुसार पीककर्ज उपलब्ध करून देणे आवश्यक असून,संचालक मंडळाकडून जाणीवपूर्वक कर्जवाटपात अडथळा आणला जात असल्याचे चौकशीत आढळल्यास नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले होते.

दरम्यान,संबंधित संस्थेने तक्रारीवर खुलासा सादर करत तक्रारदार सभासदत्वाच्या आवश्यक प्रक्रियेत पूर्णपणे पात्र नसल्याचा दावा केला आहे.कर्जवाटपासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून पात्र शेतकऱ्यांना कर्ज देण्याची संस्थेची तयारी होती.त्यामुळे तक्रारदारांचे आरोप चुकीचे असल्याचे संस्थेने स्पष्ट केले आहे.

 

मात्र,वाघचौरे यांनी आपण संस्थेचे सभासद असूनही पीककर्ज देण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप कायम ठेवला आहे.त्यामुळे शेतकरी अशोक वाघचौरे व त्यांच्या आई लता वाघचौरे यांच्या सातबाऱ्यावर पीककर्जाचा बोजा नेमका कशाच्या आधारे नोंदविण्यात आला? कर्ज मंजूर झाले होते का? मंजूर झाले असल्यास त्याचे प्रत्यक्ष वितरण झाले का? झाले असल्यास कोणाला व किती? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

या पार्श्वभूमीवर कर्जमंजुरी, सातबाऱ्यावर बोजा नोंदविण्याची प्रक्रिया,कर्जवाटपाची नोंद,संस्थेचे ठराव आणि संबंधित कागदपत्रांची सखोल तपासणी होणे गरजेचे आहे.जिल्हा उपनिबंधकांच्या निर्देशानंतर सहाय्यक निबंधकांकडून होणाऱ्या चौकशीत या प्रश्नांची उत्तरे मिळण्याची शक्यता आहे.चौकशीत तक्रारीतील आरोप तथ्यहीन ठरले तर तेही स्पष्ट होईल; मात्र, आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई होणार का,याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान,चौकशीत संस्थेच्या कामकाजात गंभीर अनियमितता अथवा नियमभंग सिद्ध झाल्यास सहकार विभाग कोणती कारवाई करणार,संस्थेवर कठोर प्रशासकीय कारवाई होणार का,याबाबतही उत्सुकता निर्माण झाली आहे. सहकार विभाग या गंभीर प्रकरणातील सत्य समोर आणणार की केवळ कागदी चौकशीचा फार्स करून प्रकरण दडपणार,याचे उत्तर आता पुढील चौकशीतूनच स्पष्ट होणार आहे.

योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

“कायदा मोडाल तर कारवाई करावीच लागेल” पोलिस निरीक्षक विजयमाला पवार यांचा इशारा

Thursday, 10 September 2026, 17:39

महसूल अधिकाऱ्यांना नागरिकांच्या भेटीसाठी दररोज २ तास राखीव ठेवावेच लागणार; मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर महसूल विभागाचा मोठा निर्णय

Thursday, 10 September 2026, 17:27

छत्रपती संभाजीनगर येथे शेती-रस्त्याच्या वादातून भाजपच्या कॅबिनेट मंत्र्याच्या भावासह पुतण्याला बेदम मारहाण..

Thursday, 10 September 2026, 17:24

पुण्यात चिमुकलीसोबत मामीचं विकृत कृत्य! दोन्ही मांड्यांवर जखमा अन् जळाल्याचे चटके; सत्य समजताच आईला बसला मोठा धक्का…

Thursday, 10 September 2026, 16:56

खराडीत बोगस डॉक्टरचा पर्दाफाश; वैध नोंदणी नसतानाही नागरिकांवर केले उपचार

Thursday, 10 September 2026, 16:31

उधारीच्या ६०० रुपयांवरून मित्रांमध्ये वाद! झोमॅटो डिलिव्हरी बॉयकडून मित्राच्या छातीत चाकूने वार

Thursday, 10 September 2026, 16:25
Next Post

कंगना राणौत अडचणीत? ‘गटर जनरेशन’ वक्तव्यावरून वाद पेटला; जेन-झींसमोर आता माघार घ्यावी लागणार?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp