Thursday, October 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात पुन्हा बिबट्याचा थरार! एका पाठोपाठ 3 दुचाकीस्वारांना केलं लक्ष्य, युवतीला पंजा लागला अन्…

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 14 October 2026, 9:25

पुणे: सिंहगडाच्या पश्चिमेकडील घेरा सिंहगड गावाजवळ बिबट्याच्या हालचालींमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खानापूर-रांजणे-पाबे मार्गावरील बापूजी बुवा मंदिर परिसरात मंगळवारी (13 ऑक्टोबर) संध्याकाळी बिबट्याने तीन दुचाकीस्वारांवर हल्ले केल्याच्या घटना समोर आल्या. यातील एका युवतीला बिबट्याचा पंजा लागल्याने ती जखमी झाली असून, तिच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, जंगलातून जाणाऱ्या आणि डोंगराचा उतार असलेल्या या रस्त्यावर सुमारे एका तासात तीन घटना घडल्या. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.

पहिली घटना सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. आंबेगाव बुद्रुक येथे राहणारे ओम शिंदे आणि तुषार कांबळे हे खामगावहून खानापूरच्या दिशेने दुचाकीवरून जात होते. त्यावेळी बिबट्याने त्यांच्या दुचाकीवर झडप घातली. बिबट्या दुचाकीच्या चाकाला धडकल्याने वाहनाचा तोल गेला; मात्र दुचाकी पडली नाही. त्यानंतर बिबट्या आवाज करत डोंगराच्या खालच्या बाजूला निघून गेला.

दुसऱ्या घटनेत थोपटेवाडी येथील धोंडीबा थोपटे हे मुलगी सोनाली आणि तिच्या मैत्रिणीसोबत खानापूरहून घरी परतत होते. यावेळी बिबट्याने त्यांच्या दुचाकीवर हल्ला केला. यात सोनालीला बिबट्याचा पंजा लागून ती जखमी झाली. तिला प्रथम खानापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारांसाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले.

 

तिसऱ्या घटनेत कोंडगाव येथील एका तरुणाच्या दुचाकीचा बिबट्याने पाठलाग केला. बिबट्या सुमारे 15 ते 20 फूट अंतरापर्यंत त्याच्या मागे धावत असल्याचे सांगण्यात आले. घटनांची माहिती मिळताच भांबुर्डा वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी रवाना झाले. दरम्यान, बिबट्याचा शोध सुरु आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

सोरतापवाडीतील पुरोगामी विद्यालयात शिक्षकाकडून विद्यार्थिनीशी अश्लील चाळे; नराधमाला अटक

Thursday, 15 October 2026, 11:05

कोतकरांच्या उद्योग समूहावर आयकरची नजर? पुण्यातील हॉटेल्समध्ये तपासणी, हेलिकॉप्टर खरेदीचीही चर्चा

Thursday, 15 October 2026, 10:59

आईच बनली लेकीची दलाल! ग्राहकांकडून पैसे घेऊन अल्पवयीन लेकीला खोलीत पाठवलं; पुण्यातील घटना

Thursday, 15 October 2026, 10:41

MPSC च्या तयारीत जुळलं प्रेम, थाटामाटात लग्नही झालं! पण संसार सुरू होताच पतीचा भयानक चेहरा उघड; नेमकं काय घडलं?

Thursday, 15 October 2026, 10:24

अंकिता भंडारीला 4 वर्षांनंतरही न्याय मिळाला नाही? न्याय मागण्यासाठी इंडिया गेटवर आंदोलन, पण पहाटेच पोलिसांची कारवाई

Thursday, 15 October 2026, 10:17

पुण्यातील MIL अधिकाऱ्याच्या घरावर CBI ची धडक; कोट्यवधींची रोकड जप्त,प्रकरणाचे धागेदोरे कुठेपर्यत ?

Thursday, 15 October 2026, 9:57
Next Post

मुलींच्या हॉस्टेलमध्ये दोघे शिरले अन् रात्रीच गोंधळ! पुणे विद्यापीठात विद्यार्थिनी आक्रमक, 2 जणांवर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp