लोणी काळभोर (पुणे) : पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व ज्युनिअर व व्होकेशनल कॉलेज लोणी काळभोर (ता. हवेली) येथे मंगळवारी (ता. ०३) क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती ‘बालिका दिन’ म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित प्राध्यापक भगिनी व विद्यार्थिनीं यांच्या हस्ते करण्यात आले. प्राध्यापिका आर. आर. बंडगर यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील मुलींना शिक्षण देण्यासाठीचा संघर्षाबाबत मार्गदर्शन केले.
इयत्ता ११ वी व १२ वी कला शाखेतील विद्यार्थिनी मदिहा सय्यद, हीना बागवान व बबीता चव्हाण यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबाबत आपले विचार व्यक्त केले. यावेळी पृथ्वीराज कपूर मेमो. ज्युनिअर व व्होकेशनल कॉलेज, लोणीकाळभोर संकुलातील सर्व प्राध्यापक बंधू, भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी वृंद व विद्यार्थी-विद्यार्थिनीं मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, या कार्यक्रमास प्राचार्य सीताराम गवळी यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए. बी. कचरे यांनी तर आभार एस. पी. टिळेकर यांनी मानले.