सासवड : संस्कृतीच्या विकासाला सर्व जाती धर्मांची गरज आहे. सर्व जाती-पाती धर्म यांची बेरीज करूनच यापुढे जगावे लागणार आहे, असे प्रतिपादन ८९ व्यां अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी केले आहे. पुढे म्हणाले, विजय कोलते यांनी आचार्य अत्रे यांचे कार्य सर्वदूर पोहचवले.
सासवडचे नाव महाराष्ट्रच्या सांस्कृतिक नकाशावर कोरण्याचे काम कोलते यांनी केले. सासवड येथे श्रीपाल सबनीस यांच्या अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन कार्यक्रम प्रसंगी व विजय कोलते यांच्या ७० व्या वर्षातील पदार्पण निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
महाराष्ट्र साहित्य परिषदेची सासवड शाखा व आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान यांच्या वतीने यां कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दोन्ही संस्थेचे पदाधिकारी, शशिकला कोलते, ललिता सबनीस ज्येष्ठ समाजवादी नेते रावसाहेब पवार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. आपल्या मनोगतात सबनीस यांनी संस्कृती, जाती पाती धर्म भेद यावर भाष्य करत परखड विचार व्यक्त केले. यावेळी मानपत्र शाल श्रीफळ देऊन सबनीस तसेच विजय कोलते यांचा सत्कार करण्यात आला.