संदीप टूले
Kedgaon News दौंड : दौंड तालुक्यातील बहुचर्चित केडगाव ग्रामपंचायतीची सदस्यपदाची सोडत प्रक्रिया बुधवारी (दि.21) दुपारी दोन वाजता पार पडली. (Kedgaon News) केडगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये 17 जागांसाठी प्रभागनिहाय आरक्षण सोडत झाली. (Kedgaon News) त्यामुळे आगामी काळात सरपंचपदासह सदस्यपदाचे स्वप्ने पाहणाऱ्यांना आपल्या प्रभागात कुठले आरक्षण निघते, याकडे लक्ष लागले होते.
केडगाव ग्रामपंचायतीची सोडत आज पार पडली. या सोडतीची विशेष उत्सुकता होती. मात्र, आरक्षण जाहीर झाल्यानंतर आपल्या प्रभागात अपेक्षित आरक्षण निघाले नसल्याने अनेक पुढारी, कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. विशेष म्हणजे सगळीकडेच इच्छुकांची संख्या जास्त असून, सरपंचपदासह सदस्यपदांचे तिकीट कोणाला द्यायचे यासाठी पक्षश्रेष्ठींचा कस लागणार आहे.
दरम्यान, अनेक इच्छुकांनी आपल्याला सरपंचपदासह सदस्यपदाचे तिकीट मिळावे, यासाठी आतापासूनच तयारी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.
आरक्षण पुढीलप्रमाणे :
सरपंच : सर्वसाधारण महिला
वार्ड क्र.१ अनुसूचित महिला, ओबीसी पुरुष, सर्वसाधारण
वार्ड क्र.२ सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण पुरुष,सर्वसाधारण पुरुष,
वार्ड क्र.३ अनुसूचित पुरुष, सर्वसाधारण पुरुष
वार्ड क्र.४ ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण
वार्ड क्र.५ ओबीसी पुरुष, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण महिला
वार्ड क्र.६ ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण