Indapur News : इंदापूर, (पुणे) : पुणे – सोलापूर महामार्गावरील पळसदेव (ता. इंदापूर) ग्रामपंचायत हद्दीत टिशू पेपरची मालवाहतूक करणाऱ्या ट्रकचे लायनर गरम झाल्यामुळे लागलेल्या आगीत संपूर्ण ट्रक जाळून खाक झाल्याची घटना घडली आहे. गुरुवारी (ता. १०) मध्यरात्री हि घटना घडली आहे. अग्निशमन दलाच्या दोन गाडांच्या मदतीने अखेर पहाटे पाच वाजता आग विझवण्यात आली.
संपूर्ण ट्रक जाळून खाक झाल्याची घटना
या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे.
उपस्थित नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रक चालक -गणेश गोविंद बोडके (रा. रिकोळगी ता. हुमनाबाद जिल्हा बिदर) हे टिशू पेपर घेऊन सोलापूरहून पुण्याकडे जात होते. मालवाहतूक ब्रीजच्या जवळ ट्रक चे लायनर गरम झाल्याने ट्रकला आग लागली. ट्रकचे व मालाचे नुकसान मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. (Indapur News)
पहाटे पाच ते साडे पाच पर्यंत दोन अग्निशामक बंब बिल्ड कंपनी भिगवण व इंदापूर नगरपरिषद यांच्या साह्याने आग विझवण्यात आली. सदरच्या घटनेच्या ठिकाणी इंदापूर पोलीस स्टेशनचा स्टाफ तात्काळ हजर झाला होता. परिस्थिती नियंत्रणात आणल्यावर वाहतूक सुरळीत करण्यात आली. आगीच्या घटनेमुळे पहाटे -महामार्गावर काही काळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. (Indapur News)