योगेश शेंडगे
रांजणगाव गणपती : शिरूर तालुक्यातील रांजणगाव एमआयडीसी मध्ये महिलेच्या पतीसोबत पैशाचे कारणावरुन झालेल्यावादातून दमदाटी करून जातिवाचक शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे. याबाबत एका महिलेच्या फिर्यादीवरून रोमन, ओम, डिग्या लोखंडे व सोबत इतर तीन ते चार त्यांचे मित्र सर्व (रा. रांजणगांव गणपती ता. शिरुर जि.पुणे) यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी त्यांचे पती व मुलगा यांचे सोबत दोन वर्षापासून रांजणगाव गणपती येथे राहण्यास आहेत. दिनांक ०७ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजताचे सुमारास फिर्यादी व त्यांचे पती मुलगा त्यांच्या घरात होते. त्यांचे पती हे नेहमी प्रमाणे कामावर जाण्याच्या तयारीत असताना, शेजारीच असणाऱ्या दुसऱ्या बिल्डींगमधील राहणारा फिर्यादी यांच्या ओळखीचा रोमन हा घरी आला. तो, पती यांना “मला १०० रुपये दे” असे म्हणाला असता, फिर्यादीचे पती त्याला म्हणाले की,” माझेकडे पैसे नाही, मला कामावर जायचे आहे.” तेव्हा त्या दोघांमध्ये किरकोळ वाद झाला. रोमन तेथून निघुन गेला. फिर्यादी यांचे पती नेहमीप्रमाणे कामावर निघून गेले.
त्यानंतर दिनांक ०८ सप्टेंबर रोजी पहाटे ०१:३० वाजणेचेसुमारास रोमन आणि फिर्यादी यांच्या घराचे शेजारी राहणारा ओम व त्याचे सोबत त्याचे इतर तीन ते चार त्याचे मित्र असे, फिर्यादी व त्यांचा मुलगा झोपेत असताना घरी आले. त्यांनी घराचा दरवाजा वाजवून आवाज दिला, तेव्हा फिर्यादी बाहेर आले असता त्यातील एक मुलगा मला म्हणाला की ” पती कुठे आहे? तेव्हा त्या म्हणाल्या की, ” ते कामावर गेले आहेत.” त्यावेळी तो फिर्यादी यांना दमदाटी करून जातिवाचक शिवीगाळ करून म्हणाला की, तुला दाखवतो, हि सर्व प्लॉटींग आमची आहे. “असे म्हणून तो व त्याचे सोबतचे मित्र तेथुन निघून गेले.
रोमन याचे फिर्यादी यांच्या पती सोबत पैशाचे कारणावरुन झालेल्यावादावरुन जातीवाचक शीवीगाळ, दमदाटी केली म्हणून त्यांचे विरुध्द फिर्याद दिली, त्यानुसार रोमन, ओम, डिग्या लोखंडे व सोबत इतर तीन ते चार त्यांचे मित्र सर्व (रा. रांजणगांव गणपती ता. शिरुर जि.पुणे) यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी शिरूर प्रशांत ढोले हे करत आहेत.