Thursday, September 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात जमिनीच्या हव्यासापायी भररस्त्यात आई-वडिलांना काठीने मारहाण! ‘माझ्या नवऱ्याला मारू नका’ म्हणत जन्मदात्रीची विनवणी पण…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 2 September 2026, 14:18

पुणे: पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. जमिनीच्या वादातून दोन मुलांनी आपल्या वृद्ध आई-वडिलांना भररस्त्यात काठी आणि दांडक्याने मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, घटनेनंतर परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही मुलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ही घटना इंदापूर तालुक्यातील तरंगवाडी येथे घडली. मिळालेल्या माहितीनुसार, आईच्या नावावर असलेली जमीन विकल्याच्या कारणावरून कुटुंबात वाद सुरू होता. याच वादातून दोन मुलांनी वडिलांशी भांडण केले. त्यानंतर हा वाद इतका वाढला की, मुलांनी आई-वडिलांना रस्त्यावर गाठून मारहाण केल्याचा आरोप आहे.

घटनेचा व्हिडिओ समोर आला असून, त्यामध्ये आई आणि वडील रस्त्यावर पडलेले दिसत आहेत. त्यांच्या जवळ एक पांढऱ्या रंगाची कार उभी असल्याचे दिसते. यावेळी एका मुलाच्या हातात काठी असून तो वडिलांना मारहाण करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

आपल्या पतीला मारहाण होत असल्याचे पाहून आईने मुलांना थांबवण्याचा प्रयत्न केला. ती हात जोडून मुलांना विनंती करत असल्याचेही व्हिडिओमध्ये दिसून येते. मात्र, तरीही मारहाण सुरूच राहिल्याचा आरोप आहे. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

 

घटनेनंतर वडिलांनी इंदापूर पोलीस ठाणे गाठून आपल्या मुलांविरोधात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी संजय तुकाराम राऊत आणि राजेंद्र तुकाराम राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

जमिनीच्या वादातून जन्मदात्या आई-वडिलांनाच मारहाण झाल्याने या घटनेची परिसरात चर्चा सुरू आहे. पोलिसांकडून प्रकरणाचा पुढील तपास केला जात असून, मारहाणीमागील नेमका वाद आणि घटनेची संपूर्ण परिस्थिती तपासली जात आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यात भाईगिरी करण्यासाठी पिस्तूल हातात घेतलं, अचानक गोळी सुटली अन् थेट मित्राच्या मांडीत घुसली; नेमकं काय घडलं?

Thursday, 3 September 2026, 16:37

पुणेकरांच्या खिशाला कात्री! रिक्षाने प्रवास करणे होणार आता आणखी महाग; आरटीओच्या नवीन भाडेवाढीला प्रत्यक्षात सुरुवात

Thursday, 3 September 2026, 16:06

बाप रे, एवढं सोनं! तिरुपती बालाजी मंदिराच्या बड्या अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधींचं घबाड! पहा धक्कादायक व्हायरल Video

Thursday, 3 September 2026, 15:52

पुण्यात DJवरून वाद चिघळला; नागपुरात विश्वास नांगरे पाटलांनी घेतला मोठा निर्णय, आता थेट कारवाई?

Thursday, 3 September 2026, 15:21

मंदिरात लग्न नंतर वाद अन् दिव्यांग बायकोला हॉटेलवर नेऊन ‘तसल्या’ अवस्थेत आक्षेपार्ह व्हिडीओ; पुण्यात तडीपार नवऱ्याला अटक

Thursday, 3 September 2026, 15:16

पुण्यात कॅमेऱ्यासमोरच विद्यानंद बापट यांच्या कानाखाली मारली; हल्लेखोर म्हणाला, ‘त्याला आणखी मारणार!’ पहा व्हायरल Video

Thursday, 3 September 2026, 14:32
Next Post

शिरूर तालुक्यात ‘मुन्नाभाई’ डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ; शिरूरच्या आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp