पुणे : आज दुपारी नगर रस्त्यावरील खराडीतील (kharadi) गोदामात आग (Fire) लागल्याची घटना घडली. यावेळी आग लागल्यानंतर मोठा धूर झाल्याने परिसरात एकच घबराट उडाली. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई करुन जप्त केलेले साहित्य गोदामात ठेवले होते. सध्या आगीमागचे कारण अद्यापही समजू शकले नाही, अशी माहिती अग्निशमन दलाने (Fire Brigade) दिली.
खराडीमध्ये शिंदे डेअरीजवळील गोदामामध्ये महापालिकेने एका गोदामात अतिक्रमण कारवाईत जप्त केलेले साहित्य ठेवले होते. बुधवारी दुपारी अडीच्या सुमारास गोदामातून मोठ्या प्रमाणावर धूर येत असल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. गोदामातील साहित्याने पेट घेतल्याने आग एकदमच भडकली आहे. यावेळी मोठ्या प्रमाणावर धूर निर्माण झाल्याने परिसरात घबराट उडाली. उन्हाळ्याचे दिवस असल्याने आग आणखी रौद्र रूप घेऊ नये यासाठी परिसरातील नागरिक चांगेलच घाबरले आहे.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे सात बंब घटनास्थळी दाखल झाले. यावेळी जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. सुदैवाने आगीत कोणी जखमी झाले नाही, अशी माहिती अग्निशमन दलाने दिली.