Monday, June 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोरमध्ये चारित्र्याच्या संशयातून पत्नीच्या डोक्यात दगड घालून जीव घेण्याचा प्रयत्न; स्वतःच नातेवाइकाला फोन करून दिली कबुली

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 6 June 2026, 12:28

लोणी काळभोर, ता. ६ : चारित्र्याच्या संशयातून पत्नीवर अमानुष हल्ला करून तिच्या डोक्यात दगड घालत जीव घेण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घडली आहे. हि घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील हनुमान मंदिराच्या परिसरात गुरुवारी (ता. ४) मध्यरात्री घडली आहे. विशेष म्हणजे, पत्नीला गंभीर जखमी केल्यानंतर आरोपी पतीने स्वतःच नातेवाइकाला फोन करून “मी तिला ठार मारण्याच्या उद्देशाने डोक्यात दगड घातला,” अशी कबुली दिल्याने खळबळ उडाली आहे.

शितल शरद वारे (वय ३४) यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. तर शरद विठ्ठल वारे (वय ३७, रा. पठारेवस्ती, कदमवाकवस्ती) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे. याप्रकरणी गोरख वारे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद वारे याला दारूचे व्यसन असून तो पत्नीच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेत होता. त्यामुळे पती-पत्नीमध्ये नेहमीच वाद होत असत. गुरुवारी (ता. ४) रात्री उशिरापर्यंत शरद वारे हा दारूच्या नशेत पत्नीशी भांडत होता. त्यावेळी तो पत्नीला शिवीगाळ करत “आज तुला मारून टाकतो,” अशी धमकी देत असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

दरम्यान, पहाटेच्या सुमारास वाद आणखी विकोपाला गेला. त्यानंतर शुक्रवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास आरोपी शरद वारे याने पत्नीच्या मोबाईलवरून त्याचा चुलत भाऊ गोरख संजय वारे याला फोन केला. “माझे आणि शितलचे खूप भांडण झाले. मी तिच्या डोक्यात दगड घालून तिला गंभीर जखमी केले आहे,” असे सांगून त्याने फोन कट केला.

या फोननंतर गोरख वारे आणि जखमी महिलेची बहीण छाया वारे यांनी घटनास्थळी धाव घेतली. हनुमान मंदिरासमोरील परिसरात रक्ताचे डाग दिसून आल्याने त्यांचा संशय अधिक बळावला. त्यानंतर त्यांनी विश्वराज रुग्णालयात चौकशी केली असता, जखमी महिलेला पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयात हलविण्यात आल्याचे समजले. ससून रुग्णालयात पोहोचल्यावर शितल वारे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे आणि त्या बेशुद्ध अवस्थेत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेनंतर गोरख वारे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

दरम्यान, पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन, मद्याच्या नशेत घरगुती वादातून शरद वारे याने शितल वारे यांच्या डोक्यात दगड घालून त्यांना गंभीर जखमी केले. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाच्या प्रयत्नासह संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे कदमवाकवस्ती परिसरात खळबळ उडाली असून, कौटुंबिक वादाचे इतके भीषण रूप पाहून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

बारामतीत ‘सिनेस्टाईल’ थरार: पत्नीशी चॅटिंगच्या संशयातून तरुणाचे अपहरण, चाकूने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न

Sunday, 7 June 2026, 20:58

उरुळी कांचन येथे दुकानदाराकडून तरुणीचा विनयभंग; दुकानदाराविरुद्ध गुन्हा दाखल..

Sunday, 7 June 2026, 20:32

केडगाव येथील धक्कादायक प्रकार! अवैध्यरित्या गर्भपात केल्याने २ डॉक्टरांवर गुन्हा दाखल

Sunday, 7 June 2026, 19:51

पुणे-मुंबई मार्ग ठप्प! 3 ते 4 किलोमीटर लांब रांगा; लोणावळ्यात पर्यटकांसह भाविकांचे हाल

Sunday, 7 June 2026, 19:44

हरवलेले मोबाईल परतले! बारामती तालुका पोलिसांची ‘हायटेक’ कामगिरी; 6 महिन्यांत 22 जणांना मिळाला दिलासा

Sunday, 7 June 2026, 19:13

पुण्यातील प्रकार! प्रेमप्रकरणातून छळ झाल्याने 21 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Sunday, 7 June 2026, 18:40
Next Post

आळंदी म्हातोबाची येथून 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता, फूस लावून पळवून नेल्याचा संशय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.