दौंड : दौंड विधानसभा निवडणुक गेले काही दिवस कोणत्या ना कोणत्या कारणावरून जोरदार चर्चेत होती. चार तारखेला काय होणार? कोणाचा आर्ज राहणार? महायुतीचे काय होणार? तसेच अपक्ष उमेदवारनी भरलेले अर्ज महायुती का महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी डोकेदुखी ठरणार? हे प्रश्न गेली काही दिवस चर्चेचे विषय बनले होते.
पण आज अखेर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे वीरधवल जगदाळे, अपक्ष बादशाह भाई शेख, राजाभाऊ तांबे, वसंत साळुंखे या मुख्य अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे ही लढाई विद्यमान आमदार राहुल कुल आणि माजी आमदार रमेश थोरात यांच्यातच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दौंडमध्ये महायुती अबाधित राखण्यात यश; राहुल कुल यांनी मानले जगदाळे यांचे आभार
गेली आठ दिवस दौंडमध्ये महायुती आबाधित राहावी यासाठी प्रयत्न केले जात होते. मात्र, आज याला यश आले आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे वीरधवल जगदाळे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. तसेच या जागेवर दावाही ठोकला होता. त्यामुळे विद्यमान आमदार राहुल कुल यांच्यासमोर महायुतीमधूनच मोठे आव्हान उभे ठाकले होते. तसेच दौंड तालुक्यातील महायुती तुटण्याच्या उंबरठ्यावरती होती. पण आज अखेर वीरधवल जगदाळे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेत महायुती अबाधित ठेवण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले असल्या कारणाने दौंडचे विद्यमान आमदार राहुल कुल यांनी वीरधवल जगदाळे यांचे आभार मानले.
अर्ज माघारी घेण्यात आलेले व्यक्ती
1.सुमन राजेंद्र म्हस्के
2.बादशाह शेख
3.बाबा जगदाळे
4.राजाभाऊ तांबे
5.वसंत साळुंखे
6.संदीप आढाव
दौंड विधानसभा 14 उमेदवार
१) राहुल सुभाष कूल (भाजपा)
२) रमेश किसनराव थोरात (एनसीपी श प गट)
३)रमेश थोरात (राष्ट्रीय मराठा पार्टी)
४)अविनाश अरविंद मोहिते(संभाजी बिग्रेड पार्टी)
५)योगेश दत्तात्रय कांबळे (बहुजन समाज पार्टी)
६)राजेंद्र निवृत्ती मस्के(अपक्ष)
७)जितेंद्र कोंदिराम पितळे (अपक्ष)
८) बिरुदेव सुखदेव पापरे (अपक्ष)
९)जाधव सुरेश बीकु (अपक्ष)
१०) संजय अंबादास कांबळे(अपक्ष)
११)उमेश महादेव म्हेत्रे (अपक्ष)
१२)शुभांगी नवनाथ धायगुडे (अपक्ष)
१३)रवींद्र कुषाबा जाधव (अपक्ष)
१४)सागर मारुती मासुडगे (अपक्ष)