Saturday, August 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“पैसे डबल करून देतो!” म्हणत निमगाव केतकीत शिक्षकांनीच गावकऱ्यांना गंडवलं; कोट्यवधींची फसवणूक, एक शिक्षक गावातून फरार

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 22 August 2026, 12:34

आदित्य बोराटे

इंदापुर: इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथील काही जिल्हा परिषद शिक्षकांनी “क्रिप्टोकरन्सी आणि शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास पैसे डबल करून देऊ” असे आमिष दाखवून गावातील अनेक नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. यामुळे गावात मोठी खळबळ उडाली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून निमगाव केतकीतील काही शिक्षकांनी गावातील ओळखीचा आणि विश्वासाचा फायदा घेतला. “आम्ही शेअर मार्केट आणि क्रिप्टोमध्ये तज्ञ आहोत, तुमचे पैसे कमी वेळात डबल होतील” असे सांगून नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम गोळा केली.

सुरुवातीला काहींना परतावा दिल्याने इतरांनीही विश्वास ठेवून पैसे दिले. मात्र आता पैसे परत मागितल्यावर संबंधित शिक्षक “बाजारात तोटा झाला आहे” असे सांगून टाळाटाळ करत आहेत.

 

आरोप आहे की यातील एका जिल्हा परिषद शिक्षकाने मोठी रक्कम गोळा केल्यानंतर तो अक्षरशः गाव सोडून गेला आहे. त्याचा सध्या कुठेही पत्ता लागत नसल्याचे स्थानिक सांगतात.

या फसवणुकीला बळी पडलेल्या नागरिकांनी आता एकत्र येऊन इंदापूर पोलिस ठाण्यात संबंधित शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे. नागरिकांकडून पुरावे आणि व्यवहारांच्या नोंदी गोळा करण्याचे काम सुरू आहे.

पैशाच्या नुकसानीमुळे काही कुटुंबे मोठ्या आर्थिक आणि मानसिक तणावातून जात आहेत. “शेअर मार्केटमध्ये पैसे डबल होतील” या हवेमुळे गुंतवणूक केलेल्या काहींना आता कर्जाचा डोंगर झाला आहे. यामुळे गावात “पुढील काळात कोणी टोकाचे पाऊल उचलतील का?” अशी भीतीही व्यक्त होत आहे.

या प्रकरणामुळे शिक्षकांच्या प्रतिमेवर परिणाम झाला आहे. शिक्षण विभाग आणि पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन चौकशी करावी, अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.

1. कोणत्याही “पैसे डबल” करून देणाऱ्या स्कीममध्ये गुंतवणूक करू नका.
2. क्रिप्टो/शेअरमध्ये गुंतवणूक फक्त SEBI नोंदणीकृत ब्रोकरमार्फतच करा.
3. रोखीत व्यवहार न करता बँक ट्रान्सफरचाच पुरावा ठेवा.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुण्यात गणेशोत्सवात DJचा दणदणाट कमी होणार! प्लाझ्मा अन् प्रेशर मीडियावर बंदी; पोलिसांचा मोठा निर्णय

Saturday, 22 August 2026, 15:27

राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमासाठी पैसे देऊन मुलं आणली? मुख्यमंत्री फडणवीसांचा गंभीर आरोप

Saturday, 22 August 2026, 15:03

पुण्यात महिलेचं हायप्रोफाईल ट्रेडिंग रॅकेट; ‘1 लाख गुंतवा, लाखोंचा परतावा मिळवा’ म्हणत अनेकांची केली फसवणूक

Saturday, 22 August 2026, 14:54

रिक्षाचालकच निघाला लुटारू! प्रवाशाला लुटण्यासाठी साथीदारासोबत रचला डाव; शिक्रापूर पोलिसांच्या जाळ्यात दोघे

Saturday, 22 August 2026, 14:36

‘आयफोन’ नव्हे तर दुसरंच कारण! पोलिसांच्या तपासातून मोठा खुलासा; खवड्या डोंगर घटनेमागचं गूढ आणखी वाढलं

Saturday, 22 August 2026, 14:26

“पदवी हातात, स्वप्नं डोळ्यांत… पण नियतीचा घाला! मुंबई-पुणे महामार्गावर तरुणाचा दुर्दैवी अंत”

Saturday, 22 August 2026, 14:24
Next Post

सोन्याच्या दराने पुन्हा गाठला मोठा टप्पा! 10 ग्रॅमसाठी मोजावे लागणार इतके रुपये; चांदीही महागली

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp