Saturday, August 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“पदवी हातात, स्वप्नं डोळ्यांत… पण नियतीचा घाला! मुंबई-पुणे महामार्गावर तरुणाचा दुर्दैवी अंत”

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 22 August 2026, 14:24

पुणे : पदवीचे शिक्षण पूर्ण करून भविष्याची स्वप्ने पाहणाऱ्या एका 21 वर्षांच्या तरुणाचा जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला असून या दुर्घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, रिद्धेश विनय शिंदे (वय 21, रा. जयभीमनगर, दापोडी) असे अपघातग्रस्त तरुणाचे नाव आहे. नुकताच तो B.Sc ची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला होता. 17 ऑगस्ट रोजी रात्री सुमारे 8:30 वाजता रिद्धेश आपल्या दुचाकीवरून दापोडी येथील घराच्या दिशेने जात होता.दापोडीच्या दिशेने चाललेल्या PMPML बसला पुढे जाऊन ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न रिद्धेश करत होता. त्याच वेळी वळणावर बसचालकाने अचानक गाडी वळवल्यामुळे दुचाकीला जोरदार धडक बसली. या भीषण धडकेत रिद्धेश वाहनासह रस्त्यावरील दुभाजकावर जाऊन आदळला आणि त्याच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाली.

वाकडेवाडी परिसरातील भुयारी मार्गाजवळ हा अपघात घडला.
या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. ऐन तारुण्यात मुलाचा असा करुण अंत झाल्याने शिंदे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या प्रकरणी मृत तरुणाचे वडील विनय शिंदे (वय 45) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी बसचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक रेखा दिघे या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

 

रस्त्यावरील ओव्हरटेकिंग आणि अपुरे भान यामुळे एका उमद्या तरुणाचा बळी गेल्याने वाहनचालकांनी वळणावर आणि वेगावर नियंत्रण ठेवणे किती गरजेचे आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमासाठी पैसे देऊन मुलं आणली? मुख्यमंत्री फडणवीसांचा गंभीर आरोप

Saturday, 22 August 2026, 15:03

पुण्यात महिलेचं हायप्रोफाईल ट्रेडिंग रॅकेट; ‘1 लाख गुंतवा, लाखोंचा परतावा मिळवा’ म्हणत अनेकांची केली फसवणूक

Saturday, 22 August 2026, 14:54

रिक्षाचालकच निघाला लुटारू! प्रवाशाला लुटण्यासाठी साथीदारासोबत रचला डाव; शिक्रापूर पोलिसांच्या जाळ्यात दोघे

Saturday, 22 August 2026, 14:36

‘आयफोन’ नव्हे तर दुसरंच कारण! पोलिसांच्या तपासातून मोठा खुलासा; खवड्या डोंगर घटनेमागचं गूढ आणखी वाढलं

Saturday, 22 August 2026, 14:26

“पदवी हातात, स्वप्नं डोळ्यांत… पण नियतीचा घाला! मुंबई-पुणे महामार्गावर तरुणाचा दुर्दैवी अंत”

Saturday, 22 August 2026, 14:24

“दादा, मी कुणाला राखी बांधू आता?” एकुलता एक भाऊही गेला; खवड्या डोंगरावर घडलेल्या घटनेने चांदवडे कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

Saturday, 22 August 2026, 13:49
Next Post

‘आयफोन’ नव्हे तर दुसरंच कारण! पोलिसांच्या तपासातून मोठा खुलासा; खवड्या डोंगर घटनेमागचं गूढ आणखी वाढलं

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp