Saturday, August 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

रिक्षाचालकच निघाला लुटारू! प्रवाशाला लुटण्यासाठी साथीदारासोबत रचला डाव; शिक्रापूर पोलिसांच्या जाळ्यात दोघे

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 22 August 2026, 14:36

अक्षय टेमगिरे

पुणे : पुणे-अहिल्यानगर महामार्गावर प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या एका रिक्षाचालकाला आणि त्याच्या साथीदाराला शिक्रापूर पोलिसांनी जेरबंद केले आहे. पोलिसांनी आरोपींकडून चोरीचा मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली रिक्षा असा एकूण १ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे.

नेमकी घटना काय?

सणसवाडी परिसरात ८ ऑगस्टच्या सायंकाळी ही घटना घडली. अंतर्यामी सुरेंदर दास कुमार (वय २२, रा. शिक्रापूर) हे रिक्षातून प्रवास करत होते. प्रवासादरम्यान अचानक रिक्षाचालक आणि त्याच्या साथीदाराने त्यांच्यावर धारदार चाकूने हल्ला केला. लुटारूंनी त्यांच्या गळ्यावर आणि हातावर वार करून सोन्याचे लॉकेट हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, अंतर्यामी यांनी धैर्याने प्रतिकार केल्याने आरोपींनी त्यांचा ओपो कंपनीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पीडिताने चालू रिक्षेतून खाली उडी मारली, तर आरोपी रिक्षेसह फरार झाले.

 

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची सखोल तपासणी केली आणि बातमीदारांकडून गोपनीय माहिती मिळवली.

तपासाच्या आधारे पोलिसांनी कोरेगाव भीमा येथे सापळा रचून हर्षवर्धन उर्फ अजय अशोक फाजगे (वय २६) आणि राहुल दिलीप फाजगे (वय २०) यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. न्यायालयाने आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही धडक कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, उपविभागीय अधिकारी रविंद्र भोसले आणि निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. यामध्ये उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर, जितेंद्र पानसरे, हवालदार दामोदर होळकर, अमोल दांडगे, रोहीदास पारखे, नारायण वाळके आणि इतर सहकाऱ्यांचा समावेश होता.

रिक्षात बसवून निर्जन ठिकाणी लुटण्याच्या या घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता, मात्र शिक्रापूर पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत आरोपींना जेरबंद करून कौतुकास्पद कामगिरी केली आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमासाठी पैसे देऊन मुलं आणली? मुख्यमंत्री फडणवीसांचा गंभीर आरोप

Saturday, 22 August 2026, 15:03

पुण्यात महिलेचं हायप्रोफाईल ट्रेडिंग रॅकेट; ‘1 लाख गुंतवा, लाखोंचा परतावा मिळवा’ म्हणत अनेकांची केली फसवणूक

Saturday, 22 August 2026, 14:54

रिक्षाचालकच निघाला लुटारू! प्रवाशाला लुटण्यासाठी साथीदारासोबत रचला डाव; शिक्रापूर पोलिसांच्या जाळ्यात दोघे

Saturday, 22 August 2026, 14:36

‘आयफोन’ नव्हे तर दुसरंच कारण! पोलिसांच्या तपासातून मोठा खुलासा; खवड्या डोंगर घटनेमागचं गूढ आणखी वाढलं

Saturday, 22 August 2026, 14:26

“पदवी हातात, स्वप्नं डोळ्यांत… पण नियतीचा घाला! मुंबई-पुणे महामार्गावर तरुणाचा दुर्दैवी अंत”

Saturday, 22 August 2026, 14:24

“दादा, मी कुणाला राखी बांधू आता?” एकुलता एक भाऊही गेला; खवड्या डोंगरावर घडलेल्या घटनेने चांदवडे कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

Saturday, 22 August 2026, 13:49
Next Post

पुण्यात महिलेचं हायप्रोफाईल ट्रेडिंग रॅकेट; ‘1 लाख गुंतवा, लाखोंचा परतावा मिळवा’ म्हणत अनेकांची केली फसवणूक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp