पुणे: सोन्या-चांदीच्या बाजारात सध्या तेजीचे वातावरण दिसत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 10 ग्रॅममागे 1,520 ची वाढ नोंदवण्यात आली. त्यामुळे 10 ग्रॅम सोन्याचा भाव आता 1,63,090 इतका झाला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा परिणाम देशांतर्गत सराफा बाजारावर होत आहे. अमेरिकन डॉलरच्या किमतीत झालेली घसरण आणि बाँड यील्डमधील बदल यामुळे सोन्याच्या दराला आधार मिळाला आहे. याशिवाय जगभरातील आर्थिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांकडून सोन्याला सुरक्षित पर्याय मानले जात असल्याने मागणीत वाढ होत आहे.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरोधात नव्या आर्थिक निर्बंधांची घोषणा केल्यानंतर जागतिक कमोडिटी बाजारात अस्थिरता वाढल्याचे चित्र आहे. त्याचा परिणाम मौल्यवान धातूंच्या बाजारावरही जाणवत आहे.

आज 24 कॅरेट सोन्यासाठी 1 ग्रॅमला 16,309 असून 100 ग्रॅम सोन्यासाठी 16,30,900 इतका भाव आहे. 22 कॅरेट सोन्याचा 1 ग्रॅमचा भाव 14,950 आहे.
चांदीचा आजचा भाव
सोन्याबरोबरच चांदीचे दरही वाढले आहेत. 1 ग्रॅम चांदीचा भाव 260 आहे. 10 ग्रॅमसाठी 2,600 आणि 1 किलो चांदीची किंमत 2,60,000 इतकी झाली आहे. जागतिक बाजारातील परिस्थिती, डॉलरची किमत आणि गुंतवणूकदारांची मागणी यावर पुढील काळात सोन्या-चांदीच्या किमती अवलंबून राहणार आहेत. त्यामुळे आगामी दिवसांत दरांमध्ये पुन्हा बदल होण्याची शक्यता आहे.







