यवत : यवत-सासवड रस्त्यावर असलेल्या भुलेश्वर घाटात तरससदृश जंगली प्राणी वावरतानाचा फोटो चालण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी कॅमेरात कैद केला आहे. यामुळे यवत परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार यवत व आजूबाजूच्या परिसरातील अनेक तरुण मॉर्निंग वॉक (चालण्यासाठी) साठी भुलेश्वर घाटात येत असतात. आज सकाळी काही तरुण रस्त्यावरून चालत जात असताना त्यांना भुलेश्वर घाटात तरससदृश प्राणी आढळून आला.
सुरवातीला कुत्रा असल्याचे वाटत होते परंतु यातील वेगळेपणा जाणवला असल्याने तरुणांनी कॅमेऱ्याच्या मदतीने पाहिले असता त्यांना कॅमेरात तरस प्राणी असल्याचे आढळून आले. याबाबत चर्चा यवत परिसरात चालू असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.