बापू मुळीक
पुरंदर : पुरंदर तालुक्यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून काही भागांमध्ये मात्र शेती पिकाचे नुकसान झाल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत यांनी आज दिनांक 22 रोजी टेकवडी गावामध्ये जावून पिकांची प्रत्येक्ष पाहणी केली असता बाजरीच्या पिकाचे नुकसान झाल्याचे दिसून आले आहे.
नुकसानीची पाहणी करून तहसिलदार विक्रम राजपूत यांनी तलाठी सागर कुचेकर यांना पंचनामे करून तहसिल कार्यालयात सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत. यावेळी तलाठी सागर कुचेकर, कृषी सहाय्यक अमर मोहिते, सरपंच महेश आंबले, उपसरपंच स्वप्निल आंबले, माजी सरपंच नवनाथ इंदलकर, विजय झिंजुरके, विनस इंदलकर, सोमनाथ इंदलकर, खंडेराव इंदलकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.