दीपक खिलारे
इंदापूर : ‘लाकडी ग्रामपंचायत हा माझा बालेकिल्ला’ असल्याचा दावा माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी नुकताच केला होता. त्यांचा हा दावा फोल ठरवत लाकडी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच व सात सदस्यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी भेट घेऊन पाटील यांचा सत्कार स्विकारला. या वेळी हर्षवर्धन पाटील यांनी सर्वांना मार्गदर्शन करीत शुभेच्छा व्यक्त केल्या.
लाकडी ग्रामपंचायतीचे नूतन सरपंच कुशाबा भिसे, सदस्य नारायण मारुती वणवे, महादेव अगंद वणवे, नामदेव धोंडिबा वणवे, माऊली महादेव वणवे, अरुण पोपट वणवे, भास्कर काशिनाथ वणवे, प्रविण भाऊसाहेब आगवणे यांचा सत्कार भाग्यश्री बंगलो इंदापूर येथे रविवारी (ता. १२) हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी पुणे जिल्हा भाजपचे सरचिटणीस दत्तू वणवे, दूधगंगा दूध संघाचे माजी संचालक भास्कर वणवे, ताराचंद वणवे, कोंडीबा वणवे, पांडुरंग वणवे, अंबादास वणवे, विष्णू वणवे, अनिल चव्हाण, सुनील चव्हाण, तात्यासाहेब आव्हाड, संजय वणवे, गोरख वणवे, राम बळी, अनिल वणवे, पोपट वणवे, बापू केकाण, राहुल खरात, आबा कोळेकर, रमेश वणवे, केशव वणवे, नाना ढोले व लाकडी ग्रामस्थ उपस्थित होते.
हर्षवर्धन पाटील यांच्या ३ ग्रामपंचायतींवरील भाजपच्या दाव्यावर शिक्कामोर्तब!
इंदापूर तालुक्यातील बावडा तसेच काझड व लाकडी या ३ ग्रामपंचायतींमध्ये भाजपचे बहुमत असल्याचा दावा भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी निवडणूक निकालानंतर केला होता. त्यानुसार इंदापूर येथे भाग्यश्री बंगलो येथे झालेल्या सत्कार समारंभास काझड ग्रामपंचायतीचे ११ पैकी भाजपचे ६ सदस्य तर लाकडी ग्रामपंचायतीचे सरपंच व ९ पैकी ७ भाजपचे सदस्य उपस्थित होते. त्यानुसार भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी ३ ग्रामपंचायतींवर केलेल्या दाव्यावर रविवारी शिक्कामोर्तब झाले.