इंदापूर : इंदापूरमध्ये नुकताच माजी मंत्री हर्षवधन पाटील यांचा भाजपातून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश सोहळा पार पडला. त्यामुळॆ आता हर्षवधन पाटील यांची इंदापूरमधून उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. कारण, इंदापूरमधील सभेत जयंत पाटील यांनी तसे सूचक विधान केले आहे. हर्षवर्धन पाटील यांनी भाजपला रामराम ठोकत आज तुतारी फुंकली आहे.
जयंत पाटील नेमकं काय म्हणाले?
‘जागावाटप निर्णय झाल्याशिवाय उमेदवारी जाहीर करता येत नाही. मी त्यांना तुतारी हातात देतोय. कार्यकर्त्यांची चर्चा केली आणि मग तिकडे गेलो इकडे गेलो आता कार्यकर्त्यांची चर्चा नाही हे फायनल आहे’ असे म्हणत जयंत पाटील यांनी एकप्रकारे हर्षवर्धन पाटील यांना विधानसभेची उमेदवारी जाहीर केली असल्याचे संकेत दिले आहे.