Friday, September 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिक्रापूरमध्ये मोबाईल शॉपी फोडणारा सराईत चोरटा जेरबंद; अल्पवयीन साथीदारासह 2 चोऱ्या केल्याचे उघड

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 12 August 2026, 16:14

अक्षय टेमगिरे

शिक्रापूर : रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत मोबाईल शॉपीचे कुलूप तोडून चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला शिक्रापूर पोलिसांनी अटक केली असून, त्याच्यासोबत एका अल्पवयीन विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. अशोक विलास उर्फ राजेंद्र भोसले, वय २४, रा. विठ्ठलवाडी, देहूगाव, ता. खेड, असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून चोरीचे तीन मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा सुमारे ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

शिक्रापूर येथील शिवराज मोबाईल शॉपीचे मालक संतोष विश्वनाथ सानप यांनी याबाबत शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. २३ जुलैच्या रात्री दहा ते २४ जुलैच्या सकाळी नऊ वाजण्याच्या दरम्यान चोरट्याने दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर मोबाईल व इतर अॅक्सेसरीज असा १७ हजार ६०० रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी गुन्हे शोध पथकाला आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासह गोपनीय बातमीदारांचे जाळे आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला.

तपासादरम्यान संशयित अशोक भोसले याच्या हालचालींवर पोलिसांनी पाळत ठेवली आणि त्याला ताब्यात घेतले. चौकशीत अशोक भोसले याने मोबाईल शॉपीमध्ये चोरी केल्याची कबुली दिली. ही चोरी त्याने एका विधी संघर्षग्रस्त साथीदाराच्या मदतीने केल्याचे तपासात समोर आले आहे. त्याच्याकडून चोरीतील तीन मोबाईल तसेच चोरीसाठी वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.

 

दरम्यान, चौकशीमध्ये आरोपीने शिक्रापूर गावच्या हद्दीतील एका मेडिकल दुकानातही चोरी केल्याची कबुली दिल्याने पोलिसांच्या तपासात आणखी एक चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे. पोलिसांनी आरोपीकडून एकूण दोन चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. अशोक भोसले हा सराईत चोरटा असून, त्याच्याविरुद्ध यापूर्वी चिखली पोलीस ठाणे, पिंपरी-चिंचवड येथे गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार आणि शिरूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे, पोलीस हवालदार गणेश कर्पे, रोहीदास पारखे, श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, शिवाजी चितारे, अमोल नलगे तसेच पोलीस कॉन्स्टेबल नारायण वाळके, राम जाधव आणि मच्छिंद्र निचीत यांच्या पथकाने केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गणेश कर्पे हे करीत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

‘इकडे कशाला आलास?’ म्हणत तरुणाला बांबूने मारहाण; फुरसुंगीत तिघांविरोधात तक्रार

Friday, 11 September 2026, 16:30

‘शरीरसंबंधाच्या हेतूनेच तिनं ‘किस’ केलं’ पुण्यात 21 वर्षीय तरुणीवर ‘पोक्सो’ दाखल; लग्नाच्या आमिषाने मुलाला कॅफेत नेलं अन्…

Friday, 11 September 2026, 16:27

जरांगे–दीपके भेटीने राजकारण तापलं! लक्ष्मण हाकेंचा थेट हल्ला, ‘तो अजून बच्चा’

Friday, 11 September 2026, 16:15

पुण्यात दारूबंदीचा मुद्दा ऐरणीवर! हायकोर्ट संतापलं,‘मग कारवाई का होत नाही?’सरकारला थेट सवाल

Friday, 11 September 2026, 15:34

पुण्यात शताब्दी एक्सप्रेसखाली दिसला माणसाचा हात! भयानक आणि अंगावर काटा आणणाऱ्या दृश्याने खळबळ; नेमकं काय घडलं?

Friday, 11 September 2026, 15:29

पुण्यात राष्ट्रवादीला मोठा हादरा! सरपंचासह ६ सदस्य अपात्र; भाजे ग्रामपंचायतीत नाट्यमय राजकीय उलथापालथ

Friday, 11 September 2026, 15:05
Next Post

पुण्याची CNG व्यवस्था कोलमडण्याच्या उंबरठ्यावर; पायाभूत सुविधांचा तातडीने विस्तार करा – PDAP ची MoPNG कडे मागणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp