Friday, September 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्याची CNG व्यवस्था कोलमडण्याच्या उंबरठ्यावर; पायाभूत सुविधांचा तातडीने विस्तार करा – PDAP ची MoPNG कडे मागणी

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 12 August 2026, 16:41

पुणे, ता. १२ : पुण्यात झपाट्याने वाढणाऱ्या CNG वाहनांच्या तुलनेत उपलब्ध पायाभूत सुविधा अपुऱ्या पडत असल्याने CNG वितरण व्यवस्था गंभीर टप्प्यावर पोहोचली आहे. कमी गॅस दाब, अपुरी फिलिंग क्षमता, DBS केंद्रांवरील वारंवार ड्राय-आऊट, तासन्‌तास लागणाऱ्या रांगा आणि वाढती वाहतूक कोंडी यामुळे पुणेकरांसह रिक्षा, टॅक्सी आणि व्यावसायिक वाहनचालक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील CNG पायाभूत सुविधांचा तातडीने विस्तार करावा, अशी मागणी पेट्रोल डीलर्स असोसिएशन पुणे (PDAP) ने केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाकडे (MoPNG) केली आहे.

PDAP चे अध्यक्ष ध्रुव रूपारेल, उपाध्यक्ष धनंजय शितोळे, कार्यकारिणी सदस्य केयूर शाह आणि अजिंक्य टेकवडे यांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाचे संयुक्त सचिव (Gas Pricing) आलोक त्रिपाठी आणि संचालक विकास सिंह यांची भेट घेत पुण्यातील CNG ग्राहक आणि डीलर्सना भेडसावणाऱ्या समस्यांचे सविस्तर सादरीकरण केले.

या बैठकीस GAIL चे व्यवस्थापकीय संचालक, MNGL चे व्यवस्थापकीय संचालक, कमर्शियल डायरेक्टर तसेच MNGL चे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पुण्यातील CNG वितरण व्यवस्थेतील अडचणी, वाढती मागणी आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांवर यावेळी सविस्तर चर्चा झाली.

७.५ लाख वाहनांचा भार केवळ १३३ केंद्रांवर!

PDAP ने मंत्रालयाच्या निदर्शनास आणून दिले की, पुण्यात सुमारे ७.५ लाख CNG वाहने केवळ १३३ CNG केंद्रांवर अवलंबून आहेत. परिणामी अनेक ठिकाणी कमी गॅस दाब, कमी फिलिंग क्षमता आणि DBS केंद्रांवरील वारंवार ड्राय-आऊटची समस्या निर्माण होत आहे. त्याचा थेट परिणाम ग्राहकांच्या प्रतीक्षा कालावधीवर आणि शहरातील वाहतूक व्यवस्थेवर होत आहे.

 

डीलर्सकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनेक CNG केंद्रांवर इंधन भरण्यासाठी ग्राहकांना किमान तीन तास प्रतीक्षा करावी लागत आहे. गर्दीच्या काळात हा प्रतीक्षा कालावधी चार ते पाच तासांपर्यंत वाढत असल्याचा दावा PDAP ने केला आहे.

रांगेत तासन्‌तास उभे; रोजीरोटीवर परिणाम

CNG केंद्रांवरील लांबच लांब रांगेचा सर्वाधिक फटका रिक्षाचालक, टॅक्सीचालक, व्यावसायिक वाहनधारक आणि रोज CNG वर अवलंबून असलेल्या नागरिकांना बसत आहे. इंधन भरण्यासाठी दररोज अनेक तास खर्च होत असल्याने त्यांच्या उत्पन्नाचे नुकसान, वेळेचा अपव्यय आणि परिचालन खर्चात वाढ होत असल्याचे PDAP ने नमूद केले. CNG चा गॅस दाब, पाइपलाइनची क्षमता, कॉम्प्रेसरवरील भार, गॅस वाटप अथवा नवीन पायाभूत सुविधांचा विस्तार यावर डीलर्सचे नियंत्रण नसतानाही वितरण व्यवस्थेतील त्रुटींमुळे निर्माण होणाऱ्या नागरिकांच्या रोषाला आणि वाहतूक कोंडीला डीलर्सनाच सामोरे जावे लागत असल्याचे संघटनेने स्पष्ट केले.

वाढती वाहने, मात्र पायाभूत सुविधा अपुऱ्या

CNG वाहनांची संख्या वेगाने वाढत असताना त्याच प्रमाणात CNG पंप, पाइपलाइन आणि इतर पायाभूत सुविधांचा विस्तार झालेला नसल्याने संपूर्ण वितरण यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. मागणी आणि उपलब्ध पायाभूत सुविधांमधील वाढती दरी ही सध्याच्या समस्येचे प्रमुख कारण असल्याचे PDAP ने बैठकीत निदर्शनास आणून दिले.

पुण्यातील CNG पुरवठ्याबाबत PDAP ने आणखी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. पुण्यात सुमारे ९४ केंद्रांना पाइपलाइनद्वारे (Online Supply) CNG पुरवठा केला जातो, तर सुमारे ३९ DBS (Daughter Booster Stations) केंद्रांना मदर स्टेशनमधून कॅस्केडद्वारे CNG पुरवठा केला जातो. मात्र, पुण्याची दररोजची एकूण CNG मागणी किती आहे, याची अधिकृत माहिती MNGL कडे उपलब्ध असून ती सार्वजनिक करण्याची मागणीही मंत्रालयाकडे करण्यात आली आहे.

नवीन CNG केंद्रांचे प्रस्ताव रखडल्याचा मुद्दा

पुण्यात नवीन CNG केंद्रांच्या प्रस्तावांबाबतही बैठकीत चर्चा झाली. अनेक प्रस्ताव दीर्घकाळापासून प्रलंबित असल्याचे PDAP ने निदर्शनास आणून दिले. या प्रस्तावांना मंजुरी का मिळत नाही किंवा त्यामध्ये विलंब का होत आहे, याबाबत MNGL आणि संबंधित प्राधिकरणांनी अधिकृत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी संघटनेने केली.

MNGL ला कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश

या गंभीर परिस्थितीची दखल घेत MoPNG ने MNGL ला सर्वसमावेशक कृती आराखडा (Action Plan) तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. या कृती आराखड्याचा आणि त्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीतील प्रगतीचा आढावा मंत्रालयाकडून एका आठवड्यानंतर घेण्यात येणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

‘आश्वासन नव्हे, प्रत्यक्ष बदल हवा’

बैठकीनंतर PDAP चे अध्यक्ष ध्रुव रूपारेल म्हणाले, “आमची मागणी अत्यंत स्पष्ट आहे—पुण्याला आश्वासनांची नव्हे, तर सक्षम पायाभूत सुविधांची गरज आहे. केवळ CNG भरण्यासाठी नागरिकांनी तीन ते पाच तास रांगेत उभे राहणे कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नाही. रांगेत घालवलेला प्रत्येक तास हा रिक्षाचालक, टॅक्सीचालक आणि व्यावसायिक वाहनधारकांसाठी थेट उत्पन्नाचे नुकसान आहे. अपुऱ्या पायाभूत सुविधांचा भार नागरिक आणि डीलर्सवर पडता कामा नये. आता जमिनीवर प्रत्यक्ष दिसणारे बदल होणे ही काळाची गरज आहे.”

PDAP ने या विषयाची गांभीर्याने दखल घेतल्याबद्दल MoPNG चे आभार मानले आहेत. तसेच CNG उपलब्धता, नेटवर्क प्रेशर, प्रतीक्षा कालावधी आणि पायाभूत सुविधांमध्ये प्रत्यक्ष सुधारणा होईपर्यंत कृती आराखड्याच्या अंमलबजावणीवर बारकाईने लक्ष ठेवून संबंधित यंत्रणांकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल, असे संघटनेने स्पष्ट केले. “PDAP ची भूमिका कोणावर आरोप करण्याची नसून, पुण्यातील नागरिक, रिक्षाचालक, टॅक्सीचालक आणि CNG डीलर्स यांच्या समस्येचे मूळ कारण दूर करून पुरेशा पायाभूत सुविधा उभारण्याची आहे,” अशी भूमिका संघटनेने स्पष्ट केली.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

MPSC परीक्षेतील पारदर्शकतेसाठी विद्यार्थ्यांचा प्रशासकीय भवनावर धडक मोर्चा; पेपरफुटीच्या आरोपांची SITमार्फत चौकशी करण्याची मागणी

Friday, 11 September 2026, 17:21

कोरेगाव पार्कच्या ‘सैराट बिर्याणी’सह साबेर रेस्टॉरंटवर FDA ची धडक कारवाई; तडकाफडकी परवाने निलंबित

Friday, 11 September 2026, 17:10

दौंडच्या जीवनरेखा हॉस्पिटलमधील डॉक्टरसह तिघांवर गुन्हा; बनावट मेडिकल रिपोर्ट, डॉक्टरचा नोंदणी क्रमांक अन् आधारकार्डाचा गैरवापर भोवला!

Friday, 11 September 2026, 16:55

‘इकडे कशाला आलास?’ म्हणत तरुणाला बांबूने मारहाण; फुरसुंगीत तिघांविरोधात तक्रार

Friday, 11 September 2026, 16:30

‘शरीरसंबंधाच्या हेतूनेच तिनं ‘किस’ केलं’ पुण्यात 21 वर्षीय तरुणीवर ‘पोक्सो’ दाखल; लग्नाच्या आमिषाने मुलाला कॅफेत नेलं अन्…

Friday, 11 September 2026, 16:27

जरांगे–दीपके भेटीने राजकारण तापलं! लक्ष्मण हाकेंचा थेट हल्ला, ‘तो अजून बच्चा’

Friday, 11 September 2026, 16:15
Next Post

अभंग, संस्कृत व हिंदी साहित्याचा त्रिवेणी संगम; ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज हिंगणकर यांना ‘संत तुकाराम महाराज साहित्य गौरव पुरस्कार’

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp