Saturday, October 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोर येथील कन्या प्रशालेच्या मुलींची इंग्रजीत भरारी! 26व्या आंतरराष्ट्रीय ‘इंग्लिश रीड फेस्ट 2026’ मध्ये पटकावला द्वितीय क्रमांक

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 17 October 2026, 11:45

लोणी काळभोर, ता.17: इंग्रजी साहित्याची समृद्ध परंपरा, वाचन संस्कृती आणि सर्जनशीलतेचा अनोखा संगम घडवून आणणाऱ्या २६व्या आंतरराष्ट्रीय ‘इंग्लिश रीड फेस्ट 2026’मध्ये श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित लोणी काळभोर (ता.हवेली) येथील कन्या प्रशालेच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय कामगिरी केली. या स्पर्धेत प्रशालेने द्वितीय क्रमांक पटकावत आपल्या यशाचा ठसा उमटवला. विद्यार्थिनींच्या या यशामुळे कन्या प्रशालेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

लोणी काळभोर येथील एम.आय.टी. आर्ट्स, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी, पुणे येथे 7 ते 10 ऑक्टोबरदरम्यान 26वी आंतरराष्ट्रीय आणि 56वी वार्षिक ELTAI परिषद आयोजित करण्यात आली होती. इंग्रजी भाषेतील साहित्याचे वाचन वाढावे, विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि वाचन संस्कृती रुजावी, या उद्देशाने या परिषदेदरम्यान इंग्रजी साहित्यावर आधारित विविध स्टॉल्स उभारण्यात आले होते.

या स्पर्धेत कथा, कादंबरी, नाटक, कविता, काल्पनिक तसेच रहस्यमय साहित्यप्रकारांचे सादरीकरण करण्यात आले. सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या शाळांसह विविध शाळांनी या उपक्रमात सहभाग घेतला होता. दररोज सुमारे 30 स्टॉल्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपली कल्पकता आणि सादरीकरण कौशल्य दाखवून दिले.

कन्या प्रशालेच्या विद्यार्थिनींनी इंग्रजी नाटकाचा मध्ययुगीन कालखंडापासून एलिझाबेथन, व्हिक्टोरियन आणि रोमँटिक कालखंडापर्यंतचा, तसेच आधुनिक काळापर्यंतचा ऐतिहासिक प्रवास विविध प्रतिकृतींच्या माध्यमातून प्रभावीपणे साकारला. साहित्याचा अभ्यास, कालखंडानुसार नाटकांमध्ये झालेले बदल आणि कल्पक मांडणी यांचा सुरेख मेळ त्यांच्या सादरीकरणात पाहायला मिळाला. या वैशिष्ट्यपूर्ण सादरीकरणामुळे प्रशालेने स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला.

 

या यशस्वी सादरीकरणात इयत्ता नववीतील सई गिरी, सुप्रिया चव्हाण, ज्ञानेश्वरी चव्हाण, श्रद्धा माने, पौर्णिमा लोमटे, वैभवी तावरे, समीक्षा कुंभार आणि श्रेया येवतीकर या आठ विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. त्यांना इंग्रजी विषयाच्या सहशिक्षिका वर्षाराणी पाटील यांनी मार्गदर्शन केले, तर अश्विनी मोकाशी यांनी सहकार्य केले.

विद्यार्थिनींच्या या यशाबद्दल कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. सुजाता भालेराव यांनी आनंद व्यक्त केला. ही कामगिरी प्रशालेसाठी अभिमानास्पद असल्याचे सांगत त्यांनी सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले आणि त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. दरम्यान इंग्रजी साहित्याची जाण, कल्पक सादरीकरण आणि सांघिक प्रयत्नांच्या जोरावर कन्या प्रशालेच्या विद्यार्थिनींनी मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी ठरले आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयात ड्रामा! आमदार सुनील शेळकेंवर RTI कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Saturday, 17 October 2026, 17:01

टीम इंडियात मोठे उलटफेर! जडेजा-शमी OUT, पंतलाही डच्चू; न्यूझीलंड दौऱ्यासाठी BCCI चे 5 धक्कादायक निर्णय..

Saturday, 17 October 2026, 16:36

“माझ्याकडे पिस्तूल आहे, मी गुन्हेगार आहे, गोळ्या घालून ठार मारीन!” न्हावरेत कार चालकाला धमकी; मारहाण करून स्विफ्टच्या काचा फोडल्या…..

Saturday, 17 October 2026, 16:05

ड्युटीवर दारू, सोफ्यावर झोप! पुण्यातील वायसीएम रुग्णालयातील अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई; प्रशासनाचा दणका…

Saturday, 17 October 2026, 15:52

1.13 कोटी देऊनही छळ थांबेना! ‘त्या’ धमकीनंतर पुण्यातील तरुण व्यावसायिकाचं टोकाचं पाऊल; शेवटच्या चिठ्ठीत गंभीर आरोप!

Saturday, 17 October 2026, 15:18

YouTube व्हिडीओ पाहून गर्भपाताचा प्रयत्न! शाळकरी मुलाने औषधी वनस्पतींचं मिश्रण केलं अन् पुढे घडलं भयंकर…

Saturday, 17 October 2026, 14:46
Next Post

दुष्काळामुळे खडकवासला कालव्याचे उन्हाळी आवर्तन बंद! पिण्याच्या पाण्यासाठी धरणांतील साठा ठेवणार राखीव; पुरंदर, दौंड, बारामती आणि इंदापूरमधील शेतकऱ्यांची चिंता वाढली

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp