Saturday, October 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“माझ्याकडे पिस्तूल आहे, मी गुन्हेगार आहे, गोळ्या घालून ठार मारीन!” न्हावरेत कार चालकाला धमकी; मारहाण करून स्विफ्टच्या काचा फोडल्या…..

योगेश मारणेby योगेश मारणे
Saturday, 17 October 2026, 16:05

न्हावरे : न्हावरे (ता.शिरूर) येथील न्हावरे-गुणाट रस्त्यावर स्विफ्ट कारला कट मारल्याचा जाब विचारल्याने पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधील तरुणांनी व त्यांच्या इतर मित्रांनी स्विफ्ट कारचालक व त्याच्या चुलत भावाला शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच, पिस्तूल असल्याची धमकी देऊन कारच्या काचाही फोडल्या. ही घटना गुरुवारी (दि.15) सायंकाळी घडली. या प्रकरणी एका अल्पवयीन मुलासह सहा जणांविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी प्रशांत नारायण वाघमारे (वय 27, रा.गुणाट, ता.शिरूर, जि.पुणे) यांनी शिरूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास प्रशांत वाघमारे हे त्यांचे चुलत भाऊ अभिजित प्रकाश वाघमारे यांच्यासोबत स्विफ्ट कारमधून (क्र. एमएच-12,टी.एस-2943) न्हावरे येथे ठिबक सिंचनाचे पाईप आणण्यासाठी जात होते.

दरम्यान न्हावरे-गुणाट रस्त्याच्या कडेला असलेल्या आप्पा खेडकर यांच्या घराजवळ 1996 असा क्रमांक असलेल्या पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओने प्रशांत वाघमारे यांच्या कारला कट मारला. याबाबत स्विफ्ट चालक वाघमारे यांनी कार थांबवून जाब विचारला असता, स्कॉर्पिओ चालकाने वाघमारे यांना शिवीगाळ केली. त्यानंतर गाडीतील एका अल्पवयीन तरुणाने “माझ्याकडे पिस्तूल आहे, मी गुन्हेगार आहे, तुम्हाला गोळ्या घालून मारून टाकीन!” अशी धमकी दिली.

याचवेळी स्कॉर्पिओ मधील अल्पवयीन मुलाने फोन करून इतर तरुणांना घटनास्थळी बोलावले. त्यानंतर सर्वांनी मिळून स्विफ्ट कार मधील प्रशांत व अभिजीत वाघमारे या दोघा चुलत भावांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि त्यांच्या स्विफ्ट कारच्या काचा फोडून नुकसान केले.

 

या प्रकरणी रवी पंढरीनाथ बिडगर, आत्माराम पंढरीनाथ बिडगर (दोघेही रा.न्हावरे, ता.शिरूर, जि.पुणे) व एका अल्पवयीन मुलासह तीन अज्ञात तरुणांच्या विरुद्ध शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन आरोपीची ओळख कायदेशीर कारणास्तव गोपनीय ठेवण्यात आली असून, या घटनेचा पुढील तपास न्हावरे पोलिस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बनकर करीत आहेत.

योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

“माझ्याकडे पिस्तूल आहे, मी गुन्हेगार आहे, गोळ्या घालून ठार मारीन!” न्हावरेत कार चालकाला धमकी; मारहाण करून स्विफ्टच्या काचा फोडल्या…..

Saturday, 17 October 2026, 16:05

ड्युटीवर दारू, सोफ्यावर झोप! पुण्यातील वायसीएम रुग्णालयातील अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई; प्रशासनाचा दणका…

Saturday, 17 October 2026, 15:52

1.13 कोटी देऊनही छळ थांबेना! ‘त्या’ धमकीनंतर पुण्यातील तरुण व्यावसायिकाचं टोकाचं पाऊल; शेवटच्या चिठ्ठीत गंभीर आरोप!

Saturday, 17 October 2026, 15:18

YouTube व्हिडीओ पाहून गर्भपाताचा प्रयत्न! शाळकरी मुलाने औषधी वनस्पतींचं मिश्रण केलं अन् पुढे घडलं भयंकर…

Saturday, 17 October 2026, 14:46

शिंदेसेनेत जुन्यांना नारळ, नव्यांना दसऱ्याचं सोनं! चार मंत्र्यांचा पत्ता कट होण्याची चर्चा; तरुणांना संधी, राज्यमंत्र्यांच्या बढतीचे संकेत

Saturday, 17 October 2026, 14:32

हिंजवडीत ड्रग्ज विक्रीसाठी तरुण आले अन् पोलिसांनी सापळा रचत दोघांना पकडले रंगेहाथ

Saturday, 17 October 2026, 14:21
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp