Saturday, July 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोरचा अट्टल गुन्हेगार गणेश विरकर सहा महिन्यांसाठी तडीपार

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 13 June 2026, 12:57

लोणी काळभोर, ता. १३ : लोणी काळभोर आणि परिसरात दहशत निर्माण करून नागरिकांना त्रास देणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर लोणी काळभोर पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. सराईत गुन्हेगार गणेश बाळासाहेब विरकर याला पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्याच्या हद्दीतून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत लोणी काळभोर पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.

गणेश बाळासाहेब विरकर (वय ४०, रा. रुपनर वस्ती, लोणी काळभोर, ता. हवेली, जि. पुणे) असे तडीपार करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश विरकर हा परिसरात वारंवार दहशत निर्माण करून सामान्य नागरिकांना त्रास देत होता. त्याच्या कृत्यांमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता. त्याच्याविरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ३५२, ३५१ (२), ३५१ (३), ११८ (१), ११५ (२), १२५ व ३ (५) अन्वये गुन्हे दाखल आहेत.

सराईत गुन्हेगारांच्या वाढत्या कृत्यांमुळे कायद्याविषयी नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण होऊ नये आणि गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवता यावे, यासाठी लोणी काळभोर पोलिसांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम ५६ अन्वये गणेश विरकर याच्याविरोधात तडीपारीचा प्रस्ताव तयार केला होता. सदर प्रस्तावाचा अभिलेख तपासून पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी तो मंजूर केला.

 

त्यानुसार गणेश विरकर याला पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्याच्या हद्दीतून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये धाक निर्माण झाला असून, सामान्य नागरिकांनी लोणी काळभोर पोलिसांच्या धाडसी आणि प्रभावी कारवाईचे स्वागत केले आहे.

ही कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विलास शिंदे, वैजनाथ शेलार पोलीस अंमलदार प्रशांत नरसाळे व महिला पोलीस अंमलदार योगिता भोसुरे यांच्या पथकाने केली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

आरोग्यवारी मॅरेथॉनमुळे पुणे, जेजुरी आणि बारामती मार्गांवर २६ जुलैला वाहतुकीत बदल

Saturday, 25 July 2026, 22:36

देशाचे नवे शिक्षण मंत्री कोण? धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीत हालचाली, ‘ही ‘नावं चर्चेत

Saturday, 25 July 2026, 22:03

राजगडावर शुल्कवसुली सुरू; मात्र स्वच्छतेचा बोजवारा! वन विभाग व पुरातत्त्व विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह

Saturday, 25 July 2026, 21:37

महात्मा गांधी विद्यालयात स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

Saturday, 25 July 2026, 20:59

तांभाड येथे महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारा चोरी; ट्रान्सफॉर्मरचेही नुकसान

Saturday, 25 July 2026, 20:53

व्हाट्सअँप डीपीवर कंपनी संचालकाचा फोटो लावून 20 लाखांची फसवणूक; राजगड पोलिसांत गुन्हा दाखल

Saturday, 25 July 2026, 20:42
Next Post

पुण्यातील आयटी इंजिनिअर आत्महत्या प्रकरणात मोठा खुलासा! 'तू नोकरी सोड' म्हणत महिला सहकाऱ्यांकडून पिळवणूक; वारंवार अपमान अन्....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.