पुणे : पुणे जिल्ह्यातील जुन्नरमध्ये बिबट्यांचा मुक्त वावर सुरु आहे. रात्रीच नव्हे तर दिवसाही बिबट्या मुक्तपणे वावरताना दिसून येतो. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बिबट्याची एवढी दहशत वाढली आहे की, त्यामुळे नागरिक घराबाहेर पडायला देखील घाबरत आहेत. असे असताना एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. त्यामध्ये तब्बल तीन बिबटे एका घरात घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे नागिरकांमध्ये आता बिबट्याची दहशत चांगलीच पसरली आहे.
विवेक गुप्ता यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंट वर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ जुन्नर तालुक्यातील असून मध्यरात्रीच्या वेळी तीन बिबटे एका घरात घुसण्याचा प्रयत्न करत असल्याचे यामध्ये स्पष्ट दिसून येते आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरलं असून, रात्री अपरात्री उसाच्या शेतात जाताना काळजी घेण्याचा आवाहन वनविभागाने केलं आहे.
सध्या एक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. एक-दोन नाही तर तीन बिबटे एका बिबट्यांनी आजपर्यंत अनेकदा थेट रस्त्यावरून जाणाऱ्या शेतकऱ्यांवर हल्ले केले आहेत. तर गावाच्या रस्त्यांवर देखील अनेकदा बिबट्यांचा थेट वावर असलेले दिसून आले आहे.