Thursday, November 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

फुरसुंगीत तोतया डॉक्टरचा कारनामा! उपचाराच्या नावाखाली महिलेच्या गुडघ्यातून रक्त काढलं; बनावट नाव अन् प्रमाणपत्राच्या आधारे रुग्णांची फसवणूक

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 5 October 2026, 15:01

पुणे : नॅचरोपॅथी केअरचा डॉक्टर असल्याचे सांगून ‘तुंबडी’ उपचाराच्या नावाखाली महिलेच्या गुडघ्यात तीन वेळा सुई टोचून रक्त काढल्याचा धक्कादायक प्रकार फुरसुंगी परिसरात समोर आला आहे. या प्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी शहजाद इक्बाल मोहम्मद खान ऊर्फ राज पटेल (वय ४२, सध्या रा. भोसरी, मूळ रा. सांगोद, कोटा, राजस्थान) याला अटक केली आहे. त्याच्याकडे वैद्यकीय उपचार करण्यासाठी कोणतेही अधिकृत प्रमाणपत्र किंवा मेडिकल कौन्सिलची मान्यता नसल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.

ही घटना ४ ऑक्टोबर २०२६ रोजी फुरसुंगी येथील भेकराईनगरमधील एस. पी. रेसिडेन्सी येथे घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने ३ ऑक्टोबर रोजी एका तरुणाला फोन करून आपण डॉक्टर असल्याचे सांगितले. त्याच्या आईच्या गुडघ्याचे उपचार करण्याची तयारीही त्याने दर्शवली. मात्र, संबंधित महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याने तरुणाने त्याला नकार दिला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आरोपी त्यांच्या घरी पोहोचला.

आरोपीने महिलेचे दोन्ही गुडघे तपासले आणि एका गुडघ्यात सुई टोचून रक्त काढले. हे रक्त अशुद्ध असल्याचे सांगत त्याने तीन वेळा रक्त काढल्याचा आरोप आहे. प्रत्येक वेळी चार हजार रुपये, असे एकूण १२ हजार रुपये त्याने घेतले. ही रक्कम स्कॅनरद्वारे पाठवण्यास सांगितल्यानंतर आणखी दोन ते तीन वेळा उपचार करावे लागतील, त्यानंतर आराम मिळेल, असेही त्याने सांगितले.

आरोपीच्या वागणुकीवर संशय आल्याने संबंधित तरुणाने गुन्हे शाखेच्या युनिट ६ मधील पोलीस हवालदार पल्लवी मोरे यांना माहिती दिली. त्यानंतर पथकाने भेकराईनगर येथे जाऊन राज पटेल नाव सांगणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याला फुरसुंगी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथे डॉ. राजेश महादेव पाखरे यांनी चौकशी केली असता त्याच्याकडे कोणतेही वैद्यकीय नोंदणी प्रमाणपत्र नसल्याचे स्पष्ट झाले.

त्याच्या रेग्झीन बॅगेत विविध औषधे आणि शहजाद इक्बाल मोहम्मद खान या नावाचे आधार कार्ड सापडले. चौकशीत त्याने शहजाद हेच आपले खरे नाव असल्याचे सांगितले. वैद्यकीय उपचार करण्याची अधिकृत परवानगी नसतानाही ‘तुंबडी’ उपचार करत असल्याचे त्याने मान्य केल्याने डॉ. राजेश पाखरे यांनी पोलिसांत फिर्याद दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शंभूराज जाधव पुढील तपास करीत आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

सुटे दूध, तूप आणि वनस्पती तेल खरेदी करू नका! तुकाराम मुंढेंचा ग्राहकांना सल्ला; भेसळ करणाऱ्यांना कारवाईचा इशारा

Thursday, 12 November 2026, 12:50

हडपसर येथे देवघराच्या खिडकीची काच काढून 47 लाखांची घरफोडी! लक्ष्मीपूजनासाठी ठेवलेले सोन्याचे दागिने आणि तब्बल साडेअकरा लाखांची रोकड लंपास

Thursday, 12 November 2026, 12:32

दौंडमध्ये कौटुंबिक वादातून पती-पत्नीवर चाकूने हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Thursday, 12 November 2026, 12:30

देऊळगाव राजेत फटाके वाजवण्यास विरोध केल्याने पोलीस पाटलाला मारहाण; तीन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल

Thursday, 12 November 2026, 12:26

फुरसुंगीत रिक्षा बाजूला घेण्याच्या वादातून टोळक्याची तिघांना बेल्ट, लाठी-काठीने बेदम मारहाण

Thursday, 12 November 2026, 12:22

शिक्षकांचा पगार 8 वर्षे थकवला, आता हायकोर्टाचा दणका! सिंहगड संस्थेची CBI, ED कडून चौकशी; हायकोर्टाची कठोर कारवाई

Thursday, 12 November 2026, 12:02
Next Post

फक्त महाराष्ट्रातच नाही तर तुकाराम मुंढेंची ख्याती सातासमुद्रापार! 'द न्यू यॉर्क टाइम्स' च्या पहिल्या पानावर मुंढेंचं 'रॉकस्टार' म्हणत कौतुक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp